आनंदवार्ता! मुलींचा जन्मदर वाढला

मनीषा मोहोड
मंगळवार, 28 जानेवारी 2020

शासनातर्फे "पीसीपीएनडीटी' कायदा लागू करून गर्भलिंग निदानावर बंदी आणण्यात आली. याशिवाय 2015 पासून राज्यभरात "बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान' राबविल्याने मुलींचा जन्मदर वाढविण्यास यश मिळत आहे. मात्र, शासनाचा उद्देश एक हजार मुलांमागे 994 मुली असा असल्याने अद्याप निश्‍चित उद्दिष्ट गाठता आले नसल्याचे वास्तव आहे.

नागपूर : राज्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत आहे. महिला आणि बालकल्याण समितीने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार जून 2019 पर्यंत राज्यात एक हजार मुलांमागे 930 मुलींची संख्या आहे. मुलींची संख्या वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. 

नागपूर शहरातील गुणोत्तर प्रमाण एक हजार मुलांमागे 951 मुली असे आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात स्त्री जन्माचे स्वागत केल्याचे दिसून येत आहे. राज्यस्तरावर सात वर्षांत एक हजार मुलांमागे 850 मुली असा जन्मदर होता. मागील सहा महिन्यांत हा दर एक हजार मुलांमागे 950च्या घरात गेला आहे. मागील काही वर्षांत अनेकांनी मुलगाच हवा, या हट्टापायी गर्भलिंग निदान चाचणीचा आधार घेत गर्भपात केल्याने मुलींचा जन्मदर खालावला होता.

महत्त्वाची बातमी - तुमची मुलगी वयात आली का? लक्ष द्या, तिच्यासोबत होऊ शकते असे काही...

मात्र, शासनातर्फे "पीसीपीएनडीटी' कायदा लागू करून गर्भलिंग निदानावर बंदी आणण्यात आली. याशिवाय 2015 पासून राज्यभरात "बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान' राबविल्याने मुलींचा जन्मदर वाढविण्यास यश मिळत आहे. मात्र, शासनाचा उद्देश एक हजार मुलांमागे 994 मुली असा असल्याने अद्याप निश्‍चित उद्दिष्ट गाठता आले नसल्याचे वास्तव आहे. 

राज्यातील मुलींचा जन्मदर

राज्यात 2013 मध्ये मुलींच्या जन्माचे लिंगप्रमाण एक हजार मुलांमागे फक्त 900 होते. जे 2013-2014 मध्ये 914 वर सुधारले गेले. पण, 2015 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 907 वर पोहोचले होते. 2016 आणि 2017 मधील जन्मनोंदणीचे प्रमाण अनुक्रमे 904 आणि 913 आहे. 2018 च्या ताज्या अहवालानुसार, हे प्रमाण 916 वर सुधारले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शहरी भागात हजार मुलांमागे मुलींची संख्या 920 होती. जून 2019 आकेवाडीनुसार 930 संख्या नोंदविली आहे. तर, ग्रामीण भागात हे प्रमाण एक हजार मुलांमागे 903 मुली असे आहे.

मुलींचा जन्मदर साठी इमेज परिणाम

नागपूर शहरात सकारात्मक चित्र

2019 या कालावधीत एक हजार मुलांमागे 951 मुली एवढे जन्मदराचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे. "पीसीपीएनडीटी'अंतर्गत नोंदणी असलेल्या शहरातील एकूण 792 उपकरणांना एमआरसी क्रमांक देण्यात आला आहे. यामध्ये 723 सोनोग्राफी उपकरणे तर 17 एमआरआय, 43 सीटी स्कॅन, 9 बी स्कॅन या उपकरणांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात शहरात 53 हजार 707 जन्मनोंदणी झालेल्या आहेत. त्यात 27 हजार 630 मुले तर 26 हजार277 मुलींची संख्या आहे. एक हजार मुलांमागे 951 मुलींची संख्या आहे.

हेही वाचा - अंघोळ करीत होती महिला अन् युवकाने साधली ही संधी...

 

Image may contain: 1 person, closeup

स्त्रीभ्रूण कचऱ्यात फेकून दिल्याच्याही घटना वाढल्या 
"बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानाअंतर्गत राज्यभरात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आलेत. बालिकादिनानिमित्त आठवडाभर मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात येत आहे. परंतु, एकीकडे जन्मदर वाढला म्हणून स्वागत करीत असताना स्त्रीभ्रूण कचऱ्यात फेकून दिल्याच्याही घटना वाढल्याचे लक्षात येत आहे. 
- अस्मिता पाटील, 
माजी प्रदेश संयोजिका, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birth rates of girls are increasing