तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपच्या नगरसेविकांचे आंदोलन

BJP corporators agitate against the Nmc Commissioner Tukaram Mundhe
BJP corporators agitate against the Nmc Commissioner Tukaram Mundhe

नागपूर : "उद्धव तुम कहासे ढुंढे, महिला अत्याचारी मुंढे' असे फलक झळकावून महिला कर्मचाऱ्यांचा छळ करण्याचा आरोप असलेले महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापालिकेच्या मुख्यालयात भाजपच्या नगरसेविकांनी काळ्या साड्या आणि तोंडाला काळा मास्क लवून आंदोलन केले. 

स्मार्ट सिटीमध्ये कार्यरत एका कर्मचारी महिलेने मुंढे यांनी मानसिक छळ केल्याची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. याशिवाय आणखी एका कर्मचारी महिलेने सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा नाकारणे, अपमानास्पद वागणूक देणे, उद्धट बोलणे असा अशा अनेक तक्रारी मुंढे यांच्या आहेत.

या विरोधात आज भाजपच्या नगरसेविकांनी मुख्यालयात ठाण मांडून मूक आंदोलन केले. प्रत्येकाच्या हाती मुंढेच्या निषेधाचे फलक होते. नारी की प्रताडना करनेवाले कमिशनरका निषेध, उद्धव तुम कहासे ढुंढे, महिला अत्याचारी मुंढे, हर भारत की नारी है, फुल नही चिंगारी है, मुंढे का कैसा व्यवहार, हर महिला पे अत्याचार असे फलक महिला नगरसेविकांची झळकावले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com