झेडपी पाठोपाठ भाजपने गमावली कन्हान नगर परिषद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

कन्हानचे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कन्हानच्या राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. ते टेकाडी जिल्हा परिषद सर्कलमधून पत्नी कल्पना हिच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांना प्राधान्य द्यावे असा आग्रह धरला. यामुळे भाजपच्या नेत्यांनी टेकाडीमधून कल्पना चहांदे यांच्या ऐवजी शालिनी बर्वे यांना उमेदवारी दिली होती.

नागपूर : कन्हान नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या करुणा आष्टणकर यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या स्वाती पाठक यांचा दोन हजार 369 मतांनी पराभव केला. कॉंग्रेसच्या माजी विरोधी पक्षनेत्या रिता बर्वे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. कन्हानच्या पहिल्या नगराध्यक्ष आशा पनिकर यांचाही पराभव झाला. नगर परिषदेच्या आठ प्रभागातील सतरा जागांपैकी सर्वाधिक सात जागांवर कॉंग्रेस, सहा भाजप, तीन शिवसेना व प्रहारने एक जागेवर विजय मिळविला.

हेही वाचा - मी बॅंक अधिकारी आहे, तुमच्या मुलीसोबत लग्न करीन...

नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. प्रहारनेही प्रथमच पूर्ण शक्तीने ही निवडणूक लढली. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही नगराध्यक्ष वगळता सर्व वॉर्डात उमेदवार उभे केले होते. यामुळे ही निवडणूक बहुरंगी झाली. कन्हान नगर परिषदेची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक होती. जिल्हा परिषद निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर भाजपला लगेच दुसरा धक्का नागपूर जिल्ह्यात बसला आहे. कॉंग्रेससाठी कन्हानमध्ये पोषक वातावरण तयार झाले असतानाही कॉंग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला नसल्याने कॉंग्रेससाठी हा अनेपक्षित पराजय आहे.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार     
उमेदवार पक्ष मते
करुणा आष्टणकर शिवसेना 5505
स्वाती पाठक भाजप 3136
रिता बर्वे कॉंग्रेस 2861
आशा पनिकर प्रहार 2776

कन्हानचे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कन्हानच्या राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. ते टेकाडी जिल्हा परिषद सर्कलमधून पत्नी कल्पना हिच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांना प्राधान्य द्यावे असा आग्रह धरला. यामुळे भाजपच्या नेत्यांनी टेकाडीमधून कल्पना चहांदे यांच्या ऐवजी शालिनी बर्वे यांना उमेदवारी दिली होती.

Image may contain: 1 person, eyeglasses and closeup
करुणा आष्ट्णकर

दोन्ही ठिकाणच्या राजकारणातून डावलल्याने चहांदे शांत राहिले. कन्हानच्या पहिल्या नगराध्यक्ष आशा पनिकर यांनी बंडखोरी करून प्रहारकडून नराध्यक्षपदाची निवडणूक लढविली. विरोधी पक्षनेत्या कॉंग्रेसच्या रिता बर्वे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. 

असे आहे पक्षीय बलाबल     
पक्ष 2020 2015
भाजप 6 11
कॉंग्रेस 7
शिवसेना 3
प्रहार 1
अपक्ष 0 1

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP lost Kanhan city council elections