वर्कशॉपमागे उडाली खळबळ...वाचा कारण 

 Body of young man found in drain
Body of young man found in drain

नागपूर : महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी शाळेच्या वर्कशॉपमागे असलेल्या नाल्यात एक 30 ते 35 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्या युवकाची ओळख पटली असून घातपात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. बिजेंद्र अथरलाल धुर्वे (वय 32, रा. कोसमी, जि. छिंदवाडा) असे मृताचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजेंद्र धुर्वे हा बुटीबोरीतील एका कंपनीत नोकरी करतो आणि बुटीबोरीतील एका परिसरात मोठ्‌या भावासह राहतो. तो मूळचा छिंदवाड्‌याचा आहे. त्याला दारूचे व्यसन. मात्र, मोठा भाऊ सोबत राहत असल्यामुळे त्याला दारू पिण्यासाठी खूप आटापीटा करावा लागतो.

गेल्या 15 दिवसांपूर्वी त्याची आई आणि लहान बहिण छिंदवाड्‌यावरून बुटीबोरीला दोघेही भावंडांना भेटायला आली होती. गेल्या पाच दिवसांपूर्वी बिजेंद्र हा आई आणि बहिणीला सोडायला गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर आला होता. बसस्थानकावर आई आणि बहिणीला बसून ठेवले आणि "लघुशंका करून येतो,' एवढे बोलून निघून गेला. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता.

त्याच्या आई आणि बहिणीने त्याची शोधाशोध करीत मध्यप्रदेश बसस्थानक पालथे घातले. परंतु तो मिळून आला नाही. त्याचा शोध गावी आणि नातेवाईकांकडेसुद्धा घेण्यात आला. सोमवारी मनपाच्या अभियांत्रिकी वर्कशॉपमधील काही कर्मचारी नाल्यातून काहीतरी सडल्याचा वास येत असल्यामुळे बघायला गेले असता एका युवकाचा मृतदेह त्यांना आढळला.

त्यांनी गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नाल्यातून युवकाचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या खिशातील आधारकार्डवरून त्याची ओळख पटविण्यात आली. त्याच्या बुटीबोरीतील भावाला बोलविण्यात आले. या प्रकरणी तुुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पीआय कुमरे यांनी सुरू केला आहे. 
 

नाका-तोंडात पाणी गेल्याने मृत्यू

 
बिजेंद्र हा दारू पिण्यासाठी बाहेर पडला होता. त्याने कुठेतरी दारू ढोसली. तो दारूच्या नशेत लघुशंकेसाठी नाल्याच्या काठावर गेला असावा. त्याचा तोल गेल्याने तो नाल्यात पडला असावा. त्याच्या नाका-तोंडात नाल्यातील पाणी आणि गाळ केल्यामुळे धुर्वेचा गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय गणेशपेठ पोलिसांनी वर्तविला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com