महाआघाडीतील मंत्र्यांचा विकासकामांच्या लोकार्पणावर बहिष्कार ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या लिबर्टी टॉकीज चौक ते मानकापूरपर्यंतच्या उड्डाणपूलाचे लोकार्पण आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री व उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांची नावे प्रमुख उपस्थिती म्हणून आहे. मात्र, राज्य सरकारचे तिन्ही मंत्री या कार्यक्रमाला अनुपस्थित दिसून आले.

नागपूर : नागपूर शहरातील विकास कामांचे लोकार्पण करण्यात येत आहे. या लोकार्पण समारंभात प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याच्या मंत्र्यांची नावे ठळकपणे निमंत्रण पत्रिकेत दिसून येत आहे. परंतु गेल्या दोन दिवसांत दोन्ही लोकार्पण समारंभातील राज्य सरकारमधील मंत्र्यांची अनुपस्थिती आता चर्चेचा विषय ठरली आहे.

सविस्तर वाचा - सोने लपविण्याची अशीही शक्‍कल, नया जमाना नयी सोच

राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या लिबर्टी टॉकीज चौक ते मानकापूरपर्यंतच्या उड्डाणपूलाचे लोकार्पण आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री व उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांची नावे प्रमुख उपस्थिती म्हणून आहे. मात्र, राज्य सरकारचे तिन्ही मंत्री या कार्यक्रमाला अनुपस्थित दिसून आले. शहराचा कार्यक्रम असल्याने पालकमंत्र्यांनी उपस्थित राहणे आवश्‍यक असल्याची चर्चा या कार्यक्रमादरम्यान रंगली होती. राजकीय मतभिन्नता असली तरी शहर विकासात एकत्र यायला हवे, अशी कुजबूज उपस्थित नागरिकांत सुरू होती. विशेष म्हणजे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आज शहरात होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. उपराष्ट्रपतींच्या स्वागतासाठीही ते उपस्थित होते. गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार शहराबाहेर असल्याचे समजते. काल, गांधीसागर येथे खाऊ गल्लीचे लोकार्पण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेतही या तिघांची नावे होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boycott by maharashtra ministers on inogration in Nagpur