प्रवाशांसाठी खुशखबर! मेट्रो स्टेशनवरून हिंगणा, बुटीबोरीपर्यंत बससेवा

Bus service from Metro station to Hingana and Butibori
Bus service from Metro station to Hingana and Butibori

नागपूर : शहरातून एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनपर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू आहे. परंतु, बुटीबोरी व हिंगणा येथे थेट मेट्रो सेवा नसल्याने मेट्रोच्या स्टेशनवरून मेट्रो प्रवाशांसाठी थेट या गावांपर्यंत फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा येथील नागरिकांना मेट्रोचा प्रवास सुसह्य होणार आहे.

बुटीबोरी आणि हिंगणा येथून दररोज हजारो प्रवासी शहरात ये-जा करतात. परंतु, मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर गावापर्यंतच्या प्रवासासाठी त्यांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो. परंतु, आता मेट्रोच्या खापरी मेट्रो स्टेशनवरून बुटीबोरीसाठी तर लोकमान्यनगर स्टेशनपासून हिंगण्यापर्यंत फिडर बससेवा सुरू करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी एमआयडीसी गेटपर्यंत तसेच गेटपासून परत खापरी स्टेशनपर्यंत बस सुरू करण्यात आली. बुटीबोरी एमआयडीसी गेटपासून सकाळी सात वाजतापासून तर खापरी स्टेशनवरून सकाळी पावणेआठ वाजतापासून दररोज बससेवा उपलब्ध राहणार आहे. रात्री आठ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.

लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय हॉस्पिटल व हिंगणा शासकीय हॉस्पिटल ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनदरम्यानही आपली बसची सेवा फिडर सर्विस म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज सकाळी ७.२५ वाजता हिंगणा येथून तर सकाळी ८.१० वाजता लोकमान्यनगर स्टेशन येथून बससेवा उपलब्ध राहील. शेवटची फेरी ७.०० व ७.३० वाजता राहील. लता मंगेशकर हॉस्पिटल, इसासनीपर्यंत फिडर सेवा लवकरच सुरू करण्याचा मानस महामेट्रोने व्यक्त केला आहे.

नॉन-मेट्रो परिसरासाठीही सुविधा

महामेट्रोने नॉन-मेट्रो परिसरासाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाऊले उचलली आहे. सुद्धा मेट्रोची कनेटिव्हिटी वाढविण्याच्या दिशेने पाऊले उचलली असून जास्तीत जास्ती प्रवाश्याना मेट्रोने जोडण्याचा मुख्य मानस आहे. ज्यामध्ये शहरातील इतर भागांना मेट्रो स्टेशनशी फिडर सर्विसच्या माध्यमाने जोडण्यात आले आहे. सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथून पिपळा फाटा, हुडकेश्वर नाका परिसर, राजापेठ, म्हाळगीनगर, न्यू सुभेदारनगर, अयोध्यानगर, रघुजीनगर, हनुमाननगर, मेडिकल चौक, गणेश बस स्टेशन, कॉटन मार्केट, धरमपेठ, शंकरनगर, रामनगर, रविनगर, डब्ल्यूसीएल कॉलनी, सेमिनरी हिल, हजारी पहाड या सर्व मार्गावर बस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय न्यू नरसाळा, भारत मातानगर, महालक्ष्मीनगर, बिडीपेठ, रघुजीनगर बस स्टॉपवरूनही मेट्रो स्टेशनवर पोहोचणे शक्य होणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com