ऑगस्ट क्रांती दिनी व्यापाऱ्यांचे ‘चीन भारत छोडो़' अभियान, तब्बल एवढया संघटना येणार एकत्र

CAIT Announces China Quit India Day On 9 August
CAIT Announces China Quit India Day On 9 August

नागपूर : भारत छोडो़ आंदोलनाच्या दिवशी देशभरातील व्यापारी ‘चीन भारत छोडो़' अभियान सुरू करणार आहे. या दिवशी देशभरातील ८०० ठिकाणी व्यापारी संघटना शहरातील प्रमुख स्थळी एकत्रित येऊन चीन भारत छोडो असा शंखनाद करणार आहे अशी माहिती अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे (कॅट) अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी दिली. पाच ऑगस्टला राम मंदीर बांधकाम सुरू होणार असल्यानेव्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठान आणि घरी दिवे लावावेत, शंखनाद करावा असे आवाहनही केले आहे. 

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. या दिनानिमित्तच चीन भारत छोडोचा नारा देण्यात येणार आहे. या वर्षात भारतीय व्यापाऱ्यांनी राखी व्यापाराच्या माध्यमातून चीनला चार हजार कोटी रुपयांचा झटका दिला आहे. चीनने सीमेवर आगळीक केल्यापासून देशात चीनविरोधी वारे वाहात आहे. त्यामुळेच चिनी वस्तूंच्या विरोधाला जोर चढला आहे.

कॅटने १० जूनपासून चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला यश मिळाले आहे. राखी तयार करण्यासाठीच्या सामानाची यंदा चीनहून आयात करण्यात आलेली नाही. याशिवाय देशभर कॅटच्या मदतीने देशांतर्गत उत्पादित वस्तूंच्या माध्यमातून मध्यमवर्गीय घरांतील महिलांकडून आणि अंगणवाडी सेविकांकडून जवळपास एक कोटी नव्या डिझाइनच्या राख्यांची निर्मिती करण्यात आली. देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या राख्यांना भारतीय ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळेच चीनला मोठा आर्थिक फटका बसल्याचीही चर्चा आहे. 


दर वर्षी राखी पौर्णिमेला अंदाजे ५० कोटी राख्यांची विक्री होते. या व्यवहाराची एकूण किंमत सहा हजार कोटी रुपये होते. गेली काही वर्षे चीनमधून येणाऱ्या सामानाची किंमतच जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. यंदा मात्र, हे सामान आले नसल्याने चीनला मोठा झटका बसला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक बाजारात आले नाही. अनेकांनी ऑनलाईन राख्यांची खरेदी केली असेही भरतीया यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com