भाजपच्या महिला आघाडीची ऊर्जामंत्र्यांच्या घरावर धडक; वीज बिल रद्द करा, नाही तर खुर्ची खाली करा

Cancel electricity bill or leave the chair
Cancel electricity bill or leave the chair

नागपूर : भारतीय जनता पक्षाने भरमसाठ वीजबिलाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र केले आहे. भाजपाच्या महिला आघाडीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या बेझनबाग येथील घरावर धडक देत वीजबिल माफ करण्याची मागणी केली. वीजबिल रद्द करा, नाहीतर खुर्ची खाली कराच्या घोषणा देत महिलांनी गर्भीत इशाराही दिला. 

लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल महावितरणकडून ग्राहकांना पाठविण्यात आले आहे. अवाजवी वीजबिल आल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा रोष आहे. भारतीय जनता पक्षानेही याविरोधात जनआंदोलन सुरू केले असून टप्प्या टप्प्याने ते तीव्र केले जात आहे. त्याच शृंखलेत सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या घरापुढे आंदोलन करण्यात आले.

भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने डॉ. राऊत यांच्या घरासमोर येत सरकार व ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. लॉकडाऊनमुळे कुणाच्याही हाताला काम नव्हते. सर्वच घटक आर्थिक विवंचनेत असल्याने लॉकडाऊनच्या काळातील शंभर दिवसांचे वीज बिल रद्द करा.

ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांना शंभर युनिट वीज मोफत देण्याचे सुतोवाच केले होते. हा शब्द खरा करून 300 युनिट वीज माफ करावी, चुकीच्या पद्धतीने आकारलेले व्याज व कर रद्द करावे, वीजदरवाढ किमान वर्षभरासाठी रद्द करावी, आदी मागण्या आंदोलनकारी महिलांनी रेटल्या.

उपमहापौर मनीषा कोठे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात माजी महापौर माया इवनाते, महापौर अर्चना डेहनकर, नंदा जिचकार यांच्या सोबतच माजी आमदार डॉ. मिलिंद माने, विक्की कुकरेजा, भोजराज डुंबे, धर्मपाल मेश्राम, संजय बंगाले, विमल श्रीवास्तव, अमित पांडे, शिवानी दाणी, मनीषा काशीकर, लता येरखेडे, मंगला गोतमारे, सुषमा चौधरी, प्रमिला माथरानी, मनोरमा जैसवाल, नीता ठाकरे, कल्पना पजारे, भाग्यश्री कानतोडे, कंचन करमरकर, अश्विनी जिचकार, संध्या ठाकरे, अनुसुया गुप्ता, प्रीती राजदेरकर, निशा भोयर, सीमा ढोमणे, नीलिमा बावणे, वंदना यंगटवार, अनिता काशीकर, मनीषा धावडे, सारिका नांदुरकर, उषाकिरण शर्मा, दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे, प्रगती पाटिल, स्वाती आखतकर, माया फुलबांदे, राखी सिंगारे, उज्ज्वला राऊत आदींचा समावेश होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com