अन्नसेवनातून वाढतोय कॅन्सर?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

कॅन्सर दिनाच्या पूर्वसंध्येला कॅन्सररोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजकाल वेळेअभावी अनेक लोक घरामध्ये रेडिमेड अन्नाचे किंवा हवाबंद अन्नाचे डबे आणून ठेवतात. जेवण्याच्या वेळी त्या डब्यांमधील अन्न काढून, मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खातात. अन्न पॅक केले जाणाऱ्या स्टील किंवा मेटलच्या डब्यांमध्ये शरीराला हानिकारक असे बीपीए असतात. यामुळे गंभीर आजार उद्‌भवू शकतात.

नागपूर : कॅन्सरचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. म्हणूनच जगभरात विविध प्रकारच्या कॅन्सररोगासंबंधीच्या प्रबोधनार्थ जागतिक कॅन्सर दिन पाळला जातो.
भारतात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी मुखाचा कॅन्सर "टॉप'वर असला, तरी रेडिमेड पॅक अन्न घरी आणून ठेवणे, भूक लागली की ते अन्न गरम करून खाणे, याशिवाय अनैसर्गिक खतांमुळे जे अन्न शरीरात जाते, त्या अन्नसेवनातून केमिकल्स व टॉक्‍सिनमुळे क्रॉनिक आजारांपासून तर विविध कॅन्सरचा धोका आहे.

अवश्य वाचा - निघाला होता शाळेत; रस्त्यात ट्रकखाली सापडला

कॅन्सर दिनाच्या पूर्वसंध्येला कॅन्सररोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजकाल वेळेअभावी अनेक लोक घरामध्ये रेडिमेड अन्नाचे किंवा हवाबंद अन्नाचे डबे आणून ठेवतात. जेवण्याच्या वेळी त्या डब्यांमधील अन्न काढून, मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खातात. अन्न पॅक केले जाणाऱ्या स्टील किंवा मेटलच्या डब्यांमध्ये शरीराला हानिकारक असे बीपीए असतात. यामुळे गंभीर आजार उद्‌भवू शकतात.
शेतीमध्ये पूर्वी नैसर्गिक खतातून भाजीपाला, अन्नधान्य पिकवायचे. परंतु, अलीकडे रासायनिक खतांचा भरमसाट वापर होतो. ही रसायनेदेखील शरीरास घातक ठरू शकतात. त्यामुळे
निरनिराळ्या खाद्य तेलांच्या जाहिराती आपण सतत टीव्हीवर पाहत असतो. अनेक आरोग्यदायी गुणांनी ही तेले युक्त आहेत, असा दावा जाहिरातींमधून केला जात असतो. या जाहिरातींना बळी पडून आपण निरनिराळी खाद्यतेले आवर्जून खरेदी करीत असतो. पण ही खाद्यतेले अनेक रासायनिक प्रक्रियांद्वारे तयार केलेली असतात. या प्रक्रियांद्वारे तेलाचा नैसर्गिक स्वाददेखील बदलला जातो. अशा रासायनिक अन्नसेवनातून पोटाचा कॅन्सर होण्याची दाट शक्‍यता असल्याचे डॉ. मानधनिया म्हणाले.

बदलती जीवनशैली घातक
आपण पाश्‍चिमात्यांचे अनुकरण करतो. मात्र, ही बदलती जीवनशैली आपल्यासाठी घातक आहे. दर दिवसाला आपल्या पोटात जाणारे अन्न किती सुरक्षित आहे, हेच ठाऊक नाही. रासायनिक खतांचा भरपूर वापर होत असल्याने पायलोरिकचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. यातून पोटाचा कॅन्सर होण्याची दाट शक्‍यता आहे. यामुळे भारतीय संस्कृतीमधील भाजीभात, पोळीकडे वळावे.
-डॉ. सुशील मानधनिया, कॅन्सररोगतज्ज्ञ, नागपूर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer growing through food service?