सीबीएसई दहावीत ओजस खामेले प्रथम 

CBSE X Ojas Khamele first
CBSE X Ojas Khamele first

नागपूर  : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) बुधवारी (ता.15) दहावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. निकालात शहरातून भारतीय विद्या भवनच्या त्रिमूर्तीनगर शाखेतील ओजस खामेले याने 99.4 टक्‍क्‍यासह शहरातून प्रथम स्थान पटकाविले. त्याच्या पाठोपाठ मॉडर्न स्कूलच्या आद्या पांडे हिने 99.2 टक्‍यासह दुसरे तर भारतीय विद्या भवनच्या त्रिमूर्तीनगर शाखेतील विनील मोखाडे याने 99 टक्‍क्‍यासह तिसरा क्रमांक पटकाविला.
 
सीबीएसई दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 20 मार्चदरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात होते. दरम्यान मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळेच यंदा मे मधील बारावीचा निकाल सीबीएसईद्वारे सोमवारी (ता.14) तर जून महिन्यात लागणारा सीबीएसईचा दहावीचा निकाल तब्बल महिन्याभराने उशिराने म्हणजे आज बुधवारी (ता.15) घोषित करण्यात आला. 

निकालात भारतीय विद्या भवनच्या त्रिमूर्तीनगर शाखेने यंदा बाजी मारली. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही याच टक्‍क्‍यावर आर्या डाऊ हिने शहरातून प्रथम स्थान पटकाविले होते. याशिवाय शहरातील विविध शाळांमधून जवळपास 25 विद्यार्थ्यांनी 98.8 टक्‍क्‍यापर्यंत मजल मारली आहे. शहरातून चाळीसहुन अधिक शाळांमधून जवळपास पाच हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 
 

शाळांमध्ये शांतता 


सीबीएसई दहावीचा निकाल म्हटला की, शाळांमध्ये पालकांसह निकाल बघण्यासाठी गर्दी दिसून यायची. याशिवाय मित्र-मैत्रिणींचा निकाल जाणून घेण्याची उत्सूकता विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बऱ्याच शाळांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मनाई केल्याचे दिसून आले. मात्र, काही शाळांमध्ये मोजक्‍या विद्यार्थ्यांनी हजेरी लावून निकालाचा आनंद साजरता केला. मात्र, बऱ्याच पालकांनी विद्यार्थ्यांसह घरीच संकेतस्थळावर निकाल बघीतले. त्यामुळे शाळेच्या आवारात कुठलेच फोटोसेशन बघायला मिळाले नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com