टिकटॉकवरून मनोरंजनासह सेलिब्रिटी देताहेत जनजागृती धडे...

ritesh deshmukh tiktok
ritesh deshmukh tiktok

नागपूर : हात कसे धुवायचे...सॅनिटायझर कसे वापरायचे...मास्क आणि रूमालाचा वापर कसा करावा...असे वेगवेगळे संदेश देणारे व्हिडिओ सध्या टिकटॉकवर झळकत आहेत. कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी आता सामान्यांसह सेलिब्रिटीही टिकटॉकचे माध्यम वापरताना दिसत आहेत. अगदी १७ सेकंदाच्या व्हिडिओमधून लोकांमध्ये कोरोनाबद्दल जागरूकतेचा विडा त्यांनी उचलला असून, कोणी गाण्यांमधून तर कोणी एखाद्या संदेशातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

संचारबंदी असल्यामुळे शहरातील तरूण-तरूणी, लहान मुलांसहित ज्येष्ठ नागरिक सुध्दा टिकटॉकच्या माध्यमातून आता बोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत. टिकटॉकचा शहरातील लोकांकडून वापर वाढला आहे. त्यावर फक्त विनोदी व्हिडिओ पोस्ट केले जातात असे आधी म्हटले जायचे. मात्र आता जागरुकतेसाठी सामान्य लोकांसह सेलिब्रिटीही मोठ्या प्रमाणात टिकटॉकवर अ‍ॅक्टिव्ह आहेत.  या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी तेही पुढाकार घेत आहेत. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी विशेष संदेशाच्या माध्यमातून, मी घरी आहे. तुम्हीही घरी राहा, असे आवाहन केले आहे. तर अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी व्हिडिओच्या माध्यमातून घरी राहा, स्वस्थ राहा, भारत कोरोनाशी लढेल असे म्हटले आहे.

दोनवेळा पुढे ढकलला विवाहसोहळा, तिसऱ्या मुहूर्ताला वधूने घेतला हा निर्णय...

अभिनेत्री काजोल यांनी घरात राहुन कुटंबीयांसोबत वेळ घालवा असे आवाहन केले आहे. तर मराठी अभिनेत्री मानसी नाईकने व्हिडिओ शेअर करून कोरोनावर प्रबोधन करण्याचे काम केले आहे. एकूणच विनोदी व्हिडिओसाठी ओळखल्या जाणार्या टिकटॉकच्या माध्यमातूनही कोरोनाचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com