नक्की वाचा... आयटीआय वेळापत्रकामध्ये बदल,  आता या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

Changes in ITI schedule, applications can be filled up to 21
Changes in ITI schedule, applications can be filled up to 21

नागपूर  ः  यंदा आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावर 70 टक्के आणि राज्य स्तरावर 30 टक्के प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरील प्रवेशास चुरस वाढेल तर राज्यस्तरावर तीस टक्के प्रवेश होणार असल्याने अधिकाधिक उमेदवारांना आपल्या जिल्ह्यात प्रवेश मिळेल. त्यानुसार जिल्हा व राज्य स्तरावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. 

जिल्ह्याबाहेरील आयटीआयमध्ये प्रवेश हवा असल्यास तेथे निवासाची व्यवस्था आहे किंवा नाही याची चौकशीची व्यवस्था पोर्टलवर उपलब्ध आहे. तसेच राज्यातील संपूर्ण आयटीआय मधील व्यवसायासंबंधीची सर्व माहिती या www.admission.dvet.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआय अभ्यासक्रमासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्ज ऑनलाइन भरण्याच्या तारखेत 14 ऐवजी 21 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

 
सर्वकाही ऑनलाईन


उमेदवारांनी नोंदणीकरिता संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरून आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यावा. एकदा यूजर आयडी पासवर्ड तयार झाला की पुन्हा लॉग इन होऊन ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरावी व भरलेली माहिती तपासून पहावी व त्यानंतरच ऑनलाईन पेमेंट करावे. कारण एकदा पेमेंट केल्यानंतर अर्जामध्ये कुठलाही बदल करता येत नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर पुन्हा लॉग इन होऊन व्यवसाय किंवा संस्थानिहाय ऑप्शन फॉर्म भरावे व ऑप्शन फॉर्म भरून सेव्ह करून ऑप्शन फॉर्म भरल्याची प्रिंट आउट आपल्याकडे जतन करून ठेवावी. पुढील प्रवेश प्रक्रिया ही संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे फेरीनिहाय होईल. नागपूर विभागाकरिता 7249541065 हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला असून, (सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत) यावर संपर्क साधता येईल.
 

मार्गदर्शन सत्रही सुरू


राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खासगी संस्थांमध्ये दिनांक 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2020 दरम्यान रोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्रआयोजित करण्यात येत आहे. या सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा. सर्व सुटीच्या दिवशी देखील मार्गदर्शन सत्र प्रवेश प्रक्रिया संबंधी कार्यवाही सुरू राहील .

संपादन : अतुल मांगे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com