मोबाईलवर नको त्या गोष्टी बघायचा, आईने हिसकावल्याने केले हे...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

वय वर्षे 14 अन्‌ व्यसन जडले मोबाईलचे... त्यामुळे तो सतत मोबाईलवरच राहायचा... यामुळे पालक नेहमीच चिंतेत असायचे... अनेकदा रागावूनही काहीही उपयोग झाला नाही. यामुळे संतप्त झालेल्या आईन रागारागात मोबाईल हिसकावून घेतला. चिडेल्या अपल्वयीन मुलाने केले हे... 

नागपूर : आजघडीला मोबाईल अत्यावश्‍यक बाब झाली आहे. अनेक गोष्टींसाठी मोबाईलची गरज भासत असते. खासगी काम असो किंवा नोकरीनिमित्त अनेक जण मोबाईल घेऊनच असतात. जसे ते "मोबाईल ऍडिक्‍ट' झाले असावे असे वागतात. असे नसले तरी याचा वाईट परिणाम लहान मुलांवर होत आहे. आई-वडिलांना बघून मुलही मोबाईलचा आग्रह धरू लागले आहेत. लहान वयातच त्यांना मोबाईलचे व्यसन लागले आहेत. एका घटनेत आईने मोबाईल हिसकल्याने अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

वंश राजू इमला (14, रा. गजानननगर, गजानन मंदिरमागे, हुडकेश्‍वर) हा इयत्ता आठवीत शिकत होता. त्याला जणू मोबाईलचे व्यसनच जडले होते. तो सतत मोबाईलवरच राहत होता. मोबाईलसाठी तो अभ्यासाकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष करीत होता. यामुळे घरचे प्रचंड रागावत होते. त्यांच्या रागावण्याकडे दुर्लक्ष करीत तो मोबाईलवरच राहत होता. 

काय झालं असावे ? - आठवडी बाजारासाठी ते गप्पा मारत निघाले आणि थरकाप उडाला, वाचा काय झाले...

आई-वडील हे दोघेही सफाई कर्मचारी असल्याने दररोज सकाळीच कामावर निघून जात होते. घरी नानी त्याच्याकडे लक्ष ठेवायची. तरीही तो शाळा बुडवून घरीच राहत होता. हे नित्याचीच बाब झाली होती. घरी असताना तो सतत मोबाईलवरच असायचा. मोबाईलवर तो नको त्या गोष्टी बघायचा. ही बाब पालकांच्या लक्षात आली. त्यामुळे आईने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल नसल्याने वंश कमालीचा अस्वस्थ झाला होता. शुक्रवारी रागाच्या भारात त्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

गळफास लावून आत्महत्या साठी इमेज परिणाम

नानी वर गेली तेव्हा वंश होता लटकलेला

शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नानी घरीच होती. वंश रागारागात वरच्या माळ्यावरील खोलीत गेला. सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने बांधून गळफास लावून घेतला. त्याचवेळी घरकामात व्यस्त असणारी नानी कामानिमित्त वर गेली. उघड्या खिडकीतून वंशने गळफास लावल्याचे तिला दिसले. हे दृश्‍य बघून तिने आरडाओरड सुरू केली. यामुळे घरची मंडळी आणि शेजारी धावून आले. वंशला खाली उतरवून उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child commits suicide in Nagpur