भारतीय रेल्वे साजरा करतेय स्वच्छता पंधरवाडा

railway.
railway.

नागपूर : भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. आधी रेल्वे स्थानक म्हणजे घाणीचे साम्राज्य, अशी समजुत होती. अलिकडे मात्र रेल्वे स्थानक चकचकीत असतात आणि रेल्वे गाड्याही स्वच्छ ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असतो. अनेक गाड्यांमध्ये बायो टॉयलेटची सोय करण्यात आली आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून रेल्वे स्वच्छता पंधरवाडा साजरा करीत आहे.

भारतीय रेल्वेच्या आदेशानुसार विभागनिहाय स्वच्छता पंधरवाडा पाळला जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवार स्वच्छ आहार तर शनिवार स्वच्छ प्रसाधन दिन म्हणून पाळण्यात आला. याअंतर्गत रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेसह संपूर्ण कॅटरिंग व्यवस्थेचे निरीक्षण करण्यात आले.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागतर्फे शुक्रवारी रेल्वे स्थानकांवरील कॅटरिंग स्टॉल व रेल्वेगाड्यांमधील पेंट्रीकारमध्ये निरीक्षण करण्यात आले. कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता विषयक निकषांचे पालन केले जात असल्याची खात्री करून घेण्यात आली.

सोबतच प्रवाशांना उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता, दर सूची यासह स्वच्छताविषयक बाबींकडे प्रकर्षाने लक्ष दिले गेले. शनिवारी स्वच्छ प्रसाधन दिनांतर्गत वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकास कुमार कश्यप यांनी नैनपुर स्टेशनला भेट देत तेथील प्रसाधनगृहांचे निरीक्षण केले. सोबतच त्या ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता उपक्रमात सहभागी होत श्रमदान केले.

विभागातील सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेची व्यापक मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकरवी सर्वत्र व्यवस्था व स्वच्छतेचे निरीक्षण करण्यात आले. प्रवाशांसोबत चर्चा करीत त्यांना बायो टॉयलेट व्यवस्थित कार्यरत असावेत यासाठी योग्य पद्धतीने उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.

सविस्तर वाचा - धक्कादायक! महिला बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फेसुद्धा शुक्रवारी स्‍वच्‍छ आहार दिन पाळला गेला. याअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावरील स्टॉल, बेस किचन व परिसरात स्वच्छता करण्यात आली. निरुपयोगी साहित्य हटवून जागा मोकळी करण्यात आली. अधिकाऱ्यांकरवी निरीक्षण करण्यात आले. विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात आले. प्रवाशांना ताजे व दर्जेदार पदार्थच मिळतील यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्‍यांनी दिले. बेसकिचनमधील कर्मचाऱ्यांच्या गणवेष, उपकरणांचीही तपासणी करण्यात आली.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com