महाविद्यालयांकडून नामांकनाचा नुसताच कांगावा; एनबीए नामांकन नसतानाही डॅशबोर्डवर खोटी माहिती

RTMNU is not NBA granted still showing on Dashboard
RTMNU is not NBA granted still showing on Dashboard

नागपूर ः अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत गुरुवारपासून प्रवेश फेरीस सुरुवात करण्यात आली. मात्र, या फेरीदरम्यान ज्या महाविद्यालयातील शाखांना एनबीएचे नामांकन नाही, अशा शाखांसमोर डॅशबोर्डवर चक्क नामांकन असल्याचे दाखविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकाराला हजारो विद्यार्थी बळी पडल्याने काही महाविद्यालयांनी याबाबत सीईटी सेलकडे तक्रार नोंदविली आहे.

राज्यात अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेस ९ डिसेंबरपासून नोंदणीस सुरुवात झाली. गुरुवारपासून महाविद्यालयांतील शाखांसाठी ऑप्शन भरण्यास सुरुवात झाली. उद्या ऑप्शन भरण्याचा शेवटला दिवस आहे. मात्र, यासाठी सीईटी सेलमार्फत डॅशबोर्डवर महाविद्यालयांचे शाखानिहाय ऑप्शन देण्यात आले होते. यामध्ये ज्या शाखांना एनबीएचे नामांकन नाही, त्या शाखांसमोर एनबीए नामांकित शाखा असे लिहिण्यात आले होते. 

विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठात केवळ पाच ते सहा महाविद्यालयातील शाखा एनबीए नामांकित आहेत. यामध्ये वायसीसीई, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, रायसोनी, केडीके महाविद्यालय आणि इतर दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. मात्र, असे असताना, यामध्ये इतरही महाविद्यालयांमधील शाखांना एनबीएचे नामांकन दाखविण्यात आले. विशेष म्हणजे ही बाब आज सकाळी काही महाविद्यालयांच्या निदर्शनात आली. त्यांनी सीईटी सेलकडे याबाबत तक्रार नोदविली. मात्र, दुपारी याबाबत कारवाई करुन सेलद्वारे त्यात सुधारणा करण्यात आली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या शाखांसाठी ऑप्शन नोंदविले. त्यामुळे या एका चुकीच्या माहितीचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसणार आहे.

प्रवेशासाठी महाविद्यालयांकडून माहिती मागविण्यात येते. ता माहिती आल्यावर सेलद्वारे अपलोड केल्या जाते. मात्र, ही माहिती ती माहिती देताना जाणिवपूर्वक चुकीची देण्यात आल्याचे दिसून येत आहे. राज्यात केवळ पन्नासावर महाविद्यालयातील शाखांना एनबीए नामांकन मिळाले आहे. ही माहिती विभागाकडे आहे, यानंतरही सीईटी सेलकडून ती तपासण्यात आली नाही हे विशेष. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com