दम असेल तर सर्वोच्च न्यायालयात द्या आव्हान

anuragthakur.jpeg
anuragthakur.jpeg

नागपूर : इंदिरा गांधी यांनी 1971 साली बांगलादेशातून भारतात येणाऱ्यांना नागरिकत्व दिले. कॉंग्रेसने युगांडातून आलेल्यांसाठी भारताचे दरवाजे उघडले होते. श्रीलंकेतील तमिळ लोकांना कॉंग्रेसने नागरिकत्व दिले आहे. मग आता सोनिया गांधी दलित, इसाई, पारसी, शिखांच्या विरोधात का आहेत, असा प्रश्‍न केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
विरोधक व्होट बॅंकेसाठी देशातील सुरक्षा धोक्‍यात आणत आहेत. जेथे भाजपचे सरकार आहे तेथेच हिंसाचार झाला. आत्तापर्यंत मोदी सरकारने घेतलेल्या कलम 370, राममंदिर अन्‌ तिहेरी तलाकसारख्या निर्णयांवर विरोधक गप्प राहिले. कारण मोदी सरकारने घेतलेले निर्णय संवैधानिक असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर सीएए व एनआरसीविरोधात दम असेल, तर सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्या, असे ठाकूर म्हणाले.

#SaturdayPositive कर्तृत्वाच्या बळावर दिव्यांगांच्या आयुष्यात फुलवला 'कमल'https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/nagpurs-kamal-waghmare-work-disabled-249076
 
ज्यांनी भारताला कधी स्वत:चा देश मानलाच नाही, ज्यांना भारतमातेचा गौरव करण्याची लाज वाटते, जे दहशतवादाला प्रोत्साहन देतात अशांना 26 जानेवारीच काय पुढील 26 वर्षे प्रयत्न केले, तरी काहीही करता येणार नसल्याची टीका अनुराग ठाकूर यांनी ओवेसी यांच्यावर केली. ओवेसी जेथे आहेत तेथेच त्यांनी आनंदी राहावे, भारतीयांनी मुस्लिमांना भावासारखे वागवले मग इतर देशांतून भारतात येऊ इच्छिणाऱ्या बौद्ध, शीख, इसाई अन्‌ पारशी लोकांना नागरिकत्व दिले, तर काय बिघडते? असा प्रश्‍न त्यांनी विचारला. देशाची अर्थव्यवस्था अशा लोकांसाठी सक्षम असून, इतर योजनांसाठी वापरला जाणारा पैसा इकडे वळविण्यात येईल, असेदेखील ठाकूर म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजप प्रदेशचे प्रवक्‍ते गिरीश व्यास आणि महापौर संदीप जोशी उपस्थित होते.

एक लाख जीएसटीचे संकलन

काही विरोधक एनआरसी आणि सीएएचा मुद्दा जीएसटीशी जोडत आहेत. मात्र, ही केवळ अफवा असून, गेल्या महिन्याभरात एक लाख कोटीचे जीएसटीचे संकलन झाले असून, या महिन्यातही तेवढेच संकलन होईल, असे अनुराग ठाकूर म्हणाले. भारताच्या भविष्यासाठी जीएसटी क्रांतिकारी निर्णय असून, यातून प्रत्येकाचाच फायदा असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्राह्मणांना न्याय दिला

काश्‍मीरचा निर्णय मोदी सरकारने घेतला अन्‌ तिथल्या ब्राह्मणांना न्याय दिला. हळूहळू विस्थापित झालेला ब्राह्मण समाज काश्‍मिरात परतत असल्याचे अनुराग ठाकूर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com