esakal | नागपुरात चाललंय तरी काय? राजकीय नेत्यांनी हा कोणता व्यवसाय सुरू केला, वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Controversial NCP leader Sahil Syed has been booked

मागील कही दिवसांपासून शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव चांगलाच चर्चेत आहे. त्याने अनेकांची फसवणूक केल्याने तसेच खंडणी मागितल्याने शिवसेनेची प्रतिमा मलीन झाली होती. यामुळेच त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

नागपुरात चाललंय तरी काय? राजकीय नेत्यांनी हा कोणता व्यवसाय सुरू केला, वाचा सविस्तर...

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : शहरात तसे मोठ मोठे नेते आहेत. माजी मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय मंत्री, गृहमंत्रीपर्यंत नेते आहेत. ते नेहमी त्यांच्या वक्‍तव्याने, कार्याने नेहमी चर्चेत असतात. तसेच राजकीय नेत्यांची नेहमी ये-जा असते. यामुळे उपराजधानीचे शहर राजकीय शहर झाले आहे. राजकारणासोबत हे शहर नेहमी क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते. खुनांच्या घटना नित्याच्या असल्याने अशी ओळख मिळत आहे. असे असताना नागपूर शहर मागील काही दिवसांपासून वेगळ्याच कारणांनी चर्चेला जात आहे. ते पुढील प्रमाणे... 

देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप अनेक राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी धडपडत आहे. राजस्थानमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू असताना भाजप सत्ता स्थापन करेल असे मत अनेकांकडून व्यक्‍त करण्यात येत आहेत. यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागेल असेही बोलले जात आहे. असे असताना शहरातील नेते आपापले मत व्यक्‍त करीत आहेत. मात्र, काही नेते वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे.

हेही वाचा - पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...

मागील कही दिवसांपासून शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव चांगलाच चर्चेत आहे. त्याने अनेकांची फसवणूक केल्याने तसेच खंडणी मागितल्याने शिवसेनेची प्रतिमा मलीन झाली होती. यामुळेच त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. आता कडवने केवळ तीन लाख रुपयांत सात एक शेती हडपल्याची तक्रार मुंबईतून गुन्हे शाखेला प्राप्त झाली आहे. हे प्रकरण अजून शमलेले नाही. 

असे असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वादग्रस्त नेता साहील सय्यद याने नावे बदलवून चार जणांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने साहीलवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऍलेक्‍सिक प्रकरणात साहील याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयालने फेटाळून लावल्याने गुन्हेशाखा पोलिस त्याला कोणत्याही क्षणी अटक करू शकते. नुकताच मानकापूरमधील ऍलेक्‍सिस हॉस्पिटलमधील डॉक्‍टरला धमकी दिल्याप्रकरणात साहील सय्यद हा चर्चेत आला होता.

अधिक माहितीसाठी - अनिल देशमुख यांच्या बैठकीतून महिला सदस्याला बाहेर काढले अन्‌ प्रकरण पोहोचल अजित पवारांपर्यंत, काय असावा प्रकार...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील सय्यद याने नावे बदलवून चार जणांची लाखो रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हेही दाखल आहेत. ऍलेक्‍सिस प्रकरणानंतर साहील व महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गंटावार चर्चेत आले. या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिसांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर गुन्हेशाखेकडे चार पीडितांनी साहील सय्यद याने फसवणूक केल्याची तक्रार केली. साहीलविरुद्ध तक्रारी आल्या आहेत. तक्रारींची चौकशी सुरू आहे, असे गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितले. 

गैरकायद्याची मंडळी जमवून धमकी दिल्याचा गुन्हा

ऍलेक्‍सिस हॉस्पिटलमध्ये आलेल्या एक महिलेचा हृदयतपासणी अहवाल दिला नसल्याचा आरोप करीत सय्यद व त्यांच्या साथीदारांनी गोंधळ घालून डॉक्‍टरांनी धमकी दिली होती. तसेच ऍलेक्‍सिस हॉस्पिटल बुलडोझरने पाडण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी सय्यद व साथीदारांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता.

क्लिक करा - लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापक प्रेयसीवर बलात्कार

सय्यदने हडपले वृद्धेचे घर

बनावट दस्तऐवजाद्वारे साहील सय्यद याने एका वृद्धेचे घर हडपल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणात साहील व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे