सुवासिनींनी दिला 'वृक्ष लावा, वसुंधरा वाचवा'चा संदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जून 2020

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.

उमरेड : यंदा वटपौर्णिमा 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरणदिनी आली. हा योगायोगच म्हणावा लागेल. मात्र, सर्वत्र कोरोना महामारीचे सावट असल्याने काही महिलांनी चक्क अंगणातच वटवृक्षाची पूजा करून व्रत पूर्ण केले. तसेच वृक्षसंवर्धनाचा संदेशही दिला. 

शुक्रवारी परसोडी परिसरातील महिला घरासमोर अंगणातच मातीच्या मडक्‍यात लावलेल्या वटवृक्षाची पूजाअर्चा करताना दिसून आल्या. अवघ्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाचे पडसाद वटपौर्णिमा व्रतावरसुद्धा पडल्याचे दिसून आले. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरण दिवस व वटपौर्णिमा व्रत हा जणू दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. कारण, खऱ्या अर्थाने पर्यावरण दिवस साजरा करायचा झाल्यास वृक्षवल्लींची पूजाअर्चा, त्यांचे संगोपन व संवर्धन करूनच तो दिवस साजरा करता येऊ शकतो. हिंदू धर्मानुसार जीवसृष्टीतील अनेक महत्त्वाच्या घटकांना सणासुदीला महत्त्व देत त्यांची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. त्यापैकी वटपौर्णिमा हे एक व्रत आहे. 

हेही वाचा : पोटाचा प्रश्‍न सोडवू, की कर्जाचे हप्ते फेडू, बचत गटाच्या महिला अडचणीत 

हेही वाचा : पोटाचा प्रश्‍न सोडवू, की कर्जाचे हप्ते फेडू, बचत गटाच्या महिला अडचणीत 

उमरेड शहर व तालुक्‍यात अनेक ठिकाणी विपुल वृक्षसंपदा आहे. येथे महिलांनी मोठ्या उत्साहात तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर व स्वच्छतेची काळजी घेत साजरी केली. याशिवाय "वृक्ष लावा, वसुंधरा वाचवा' मौलिक संदेश देत जागतिक पर्यावरण दिवससुद्धा साजरा केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conveyed the massage of tree conservation