कोरोनाचे २४ तासांत १६ मृत्यू; मेयो, मेडिकल व एम्समध्ये संख्या वाढली

Corona died sixteen in twenty four hours
Corona died sixteen in twenty four hours

नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत आठ दिवसांपासून वाढ सुरू आहे. मेडिकल, मेयो व एम्ससह जिल्ह्यातील ११५ कोविड रुग्णालयांमध्ये नऊशे कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. मात्र, पाच दिवसांत या रुग्णालयांतील आकडा वाढला आहे. शनिवारी एक हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू होते. नव्याने ३६३ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा बाधितांची संख्या शहरात जास्त आढळून आली. रुग्ण बरे होण्याचा टक्का घसरला असून तो ९३.२१ टक्क्यांवर आला आहे.

जिल्ह्यात आढळून आलेल्या ३६३ बाधितांपैकी शहरात ३०५ तर ग्रामीण भागात ५३ जणांचा समावेश आहे. तर जिल्ह्याच्या बाहेरील पाच जण बाधित आढळले. जिल्ह्यातील आठ कोरोना चाचणी प्रयोगशाळांमध्ये शनिवारी चाचण्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून दररोज सहा हजारावर चाचण्या होत असल्याने बाधितांचीही संख्या वाढत आहे.

नागपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत १ लाख ८३ हजार ६३ रुग्ण आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळांमध्ये १ हजार ७६७ चाचण्या झाल्या असून, ९० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तर मेयोत १ हजार ७२२ चाचण्या झाल्या. यात २६ बाधित आढळले. एम्समध्ये ४३३ चाचण्या झाल्या असून, यातील २७ जणांना बाधा झाली आहे. मेडिकलमध्ये ६८१ चाचण्यांपैकी १५० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल पुढे आला.

२०८ जणांची मात

ऑक्टोंबर महिन्यात ३१ दिवस सातत्याने कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक होती. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशीही १९२ कोरोनाबाधित आढळून आले तर ५१२ जणांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुढे कोरोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा कमी होत गेली. शनिवारी बाधितांची संख्या ३६३ आढळून आली तर कोरोनावर २०८ जणांनी मात केली. यामुळे कोरोनामुक्तांची संख्या १ लाख १ हजार ९ झाली आहे.

रिकव्हरीचा टक्का घसरतोय

  • १७ नोव्हेंबर : ९३.८० टक्के
  • १८ नोव्हेंबर : ९३.६२ टक्के
  • १९ नोव्हेंबर : ९३.४७ टक्के
  • २० नोव्हेंबर : ९३.३३ टक्के
  • २१ नोव्हेंबर : ९३.२१ टक्के

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com