Corona kills man at Telangkhedi in Nagpur
Corona kills man at Telangkhedi in Nagpur

कोरोनाबाबतचा हा समज ठरला खोटा; तेलंखेडीतील व्यक्तीचा मृत्यू

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) सारी आजारावरील उपचारासाठी मध्यरात्र उलटल्यानंतर दाखल झालेल्या रुग्णाचा पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली. सारी आजारानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल मेयोच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झाला. 65 वर्षीय व्यक्ती तेलंखेडी येथील रहिवासी आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्यानंतर तो लगेच दगावला. काही तासातच व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासनन हादरले. 

कोरोनासह सारीने ग्रस्त असलेली साठीतील व्यक्ती मध्यरात्रीनंतर दोन वाजता मेयोत दाखल झाली. तत्काळ कोरोना चाचणीसाठी घशातील नमुने घेण्यात आले. दरम्यान, धुम्रपान करीत असल्याने त्याला फुप्फुसाचा गंभीर आजार म्हणून "क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्‍टिव्ह पल्मनरी'चे (सीओपीडी) देखील निदान झाले. अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळात नसल्याचे पुढे आले. रविवारी सकाळी नऊ वाजता या व्यक्तीचा मृत्यू झाला.

चिंतेची बाब म्हणजे, शहरातील 26व्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी), एम्स आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि पशुवैद्यकीय संस्थेतील विषाणू प्रयोगशाळेतून सुमारे पाचशेवर नमुने तपासले गेले. 

रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानासह मिनी मातानगर, नाईक तलाव बांगला देश, तेलंखेडी, दिघोरी, सावनेर, हुडकेश्‍वर, महादुला परिसरातील कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,744 वर पोहोचला आहे. शहरात मृतांची संख्या 26 झाली आहे. मेडिकल, मेयो तसेच एम्समधील कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अनलॉक ठरला प्रादुर्भावास कारणीभूत

लॉकडाउनच्या शिथिलतेमुळे प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या गेल्या आठवड्याभरापासून झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचा आकडाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या 1 ते 5 जुलै 2020 या पाच दिवसांत दोनशेपेक्षा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर तेलंखेडी येथील 5 जुलै रोजी झालेला मृत्यू हा या महिन्यातील पहिला मृत्यू आहे. 

सर्व वयोगटांत कोरोनाचा संसर्ग

लहान मुलांना तसेच वयस्कांना सर्वाधिक कोरोना संसर्गाची जोखीम असल्याचे वैद्यक तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. मात्र, शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 9 महिन्यांच्या चिमुकल्यापासून तर 73 वर्षे वयोगटातील वृद्ध व्यक्ती अडकले आहेत. विशेष असे की, तरुण रुग्णांची संख्याही अधिक आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग केवळ वयोवृद्ध आणि लहान मुलांना अधिक होतो, हा समजही यानिमित्ताने खोटा ठरला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com