कोरोना बाधिताच्या दुकानातील नोकराला झाली बाधा, नागपूरची संख्या पुन्हा वाढली

corona patient
corona patient

नागपूर : शहरत कोरोना विषाणू बाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे चित्र आहे, रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. मात्र दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी उपराजधानीत आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून पुढे आले.

खामला येथील दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी दोघे कोरोनाबाधित निघाले. यात शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची १६ वर्षीय मुलगी तर बाधित रुग्णाच्या दुकानात काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या रुग्णासह नागपुरातील बाधितांची संख्या १४ वर पोहचली आहे.

कोरोना विषाणूच्या साथीचा उद्रेक रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाले. मात्र, असे असताना  नागरिक  रस्त्यावर दिसून येत आहेत. यामुळे जोखीम वाढत आहे . यातून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे घराबाहेर पडूच नका, असा वारंवार सल्ला डॉक्टर देत आहेत. शनिवारी आलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांमधून एक ४० वर्षीय व्यक्ती गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या दुकानात काम करीत होता. 

३७५ नमुने निगेटिव्ह
मेयोच्या प्रयोगशाळेला ७२ नमुने प्राप्त झाले. यातील बहुसंख्य नमुने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे व त्यांच्या वसाहतीतील नागरिकांचे आहेत. आतापर्यंत ३८६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ३७५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. 

संशयितांचे वॉर्ड हाऊसफुल्ल
बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोरोना संशयित रुग्णांचा आकडा वाढत आहे. मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये २९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक भार मेयोवर पडला आहे. मेयोने बाधित रुग्णांसाठी २० खाटांचा वॉर्ड क्र. २४, संशयित रुग्णांसाठी २०-२० खाटांचे वॉर्ड क्र. ४ व ६ उपलब्ध करून दिला आहे. आज दिवसभरात मेयोच्या दोन्ही संशयितांच्या वॉर्डमध्ये ४० रुग्ण दाखल झाले आहे. यामुळे दोन्ही वॉर्ड हाऊसफुल्ल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com