कोरोनावर मात करण्यासाठी चार प्राध्यापकांनी काय केले संशोधन... वाचा

corona : The professor created a multifocal disinfection device
corona : The professor created a multifocal disinfection device

नागपूर : संपूर्ण जगाला सध्या कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या रूपाने आरोग्य संकटाचा सामना करावा लागत आहे. अशी परिस्थिती अनुकूल नसली तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चार संशोधक प्राध्यापकांनी कोविड -19 च्या निर्जंतुकीकरणासाठी मल्टीफोकल निर्जंतुकीकरण यंत्र आणि ड्रोन आधारित दूषित पृष्ठभाग निर्जंतुकीकरण यंत्राची निर्मिती करण्यात यश मिळविले. हे संशोधनाची पेटंटसाठी नोंदणी करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्याने प्रत्येक देशात कोरोना व्हायरसने ग्रस्त लोकांची चाचणी, अलगीकरण आणि उपचार करणे यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. सतत वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभर वाढत आहे. त्याचा प्रसार थांबविणे मोठे आव्हान आहे. त्याचा प्रसार थांबविण्याची एक पद्धत म्हणजे दूषित पृष्ठभाग आणि निर्जंतुकीकरण करणे एवढाच आहे.

यासाठी अनेक पद्धतीचा उपयोग करण्यात येतो. मात्र, कोणत्याही पद्धती 100 टक्के कार्यक्षम नाहीत. त्यामुळे स्वतंत्र पद्धती वापरून निर्जंतुकीकरणाच्या दोन किंवा अधिक पद्धतींचे संयोजन 100 टक्के कार्यक्षम आहे, हे सिद्ध झाले आहे.

 याची कार्यक्षमता साध्य करण्यासाठी एकाच "डिव्हाइस'मध्ये दोन किंवा अधिक निर्जंतुकीकरण तंत्र एकत्र करणे ही काळाची गरज आहे. हे लक्षात घेता, भौतिकशास्त्र विभागाचे प्रो. डॉ. संजय ढोबळे, एलआयटीच्या रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्रो. भारत ए. भानवसे, डॉ. निशिकांत राऊत आणि फार्मास्युटिकल सायन्स विभागाचे डॉ. दादासाहेब एम. कोकरे यांनी एकत्र येत अतिनील, रासायनिक आणि उष्णता निर्जंतुकीकरण पद्धतींसह मल्टीफोकल निर्जंतुकीकरण डिव्हाइसचे डिझाइन आणि उपकरण बनवण्याची संकल्पना मांडली. विशेष म्हणजे त्यास पेटंटसाठी दाखल केले आहे.


असे आहे उपकरण


उपकरणांमध्ये यूव्ही लाइट इरिडिएशन समाविष्ट आहे जे 200 ते 350 एनएमपर्यंत तरंग उच्च तीव्रतेचे उत्सर्जन करते. बहुतेक सूक्ष्मजीव, जीवाणू, विषाणू इत्यादींसाठी अतिनील किरणांची उच्च पातळी प्राणघातक मानली जाते. त्याशिवाय, अतिनील किरणांचे तरंग, पृष्ठभागावर हवायुक्त रोगकारकांपेक्षा अधिक प्रभावी आहे. अतिनील प्रकाश सतत किंवा स्पंदित असू शकतो आणि अतिदक्षता असलेल्या अतिनील दिवे प्राधान्य दिले जातात. केमिकल बेस्ड निर्जंतुकीकरणात नियमितपणे कार्यरत, कमी प्रभावी आणि सहज उपलब्ध रासायनिक जंतुनाशक जसे क्‍लोरीन आणि क्‍लोरीन संयुगे, फॉर्मल्डिहाइड, ग्वेल्टरल्डिहाइड, क्वॉटरनरी अमोनियमचा वापर करण्यात आला. यंत्रातील गरम हवेच्या धक्‍क्‍याने निर्जंतुकीकरण केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com