Corona Update : नागपुरात कोरोनामुक्तीचा दर ९० टक्के; संक्रमणाचा वेग झाला संथ

Corona repair rate in Nagpur is ninety percent
Corona repair rate in Nagpur is ninety percent

नागपूर : मागील २० दिवसांपासून दर दिवसाला नवीन कोरोनाबाधितांच्या संक्रमणाचा वेग संथ झाला आहे. दिवसभरात अवघे ४५७ बाधित आढळले. तर २४ तासांमध्ये १९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. यामुळे जिल्ह्यात दगावलेल्यांची संख्या २ हजार ९६६ झाली. कोरोना बाधितांचा आकडा ९१ हजार १३२ वर पोहोचला. ४९७ जणांनी सोमवारी (ता.१९) कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या ८१ हजार ८५६ वर पोहोचली. कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्का ९० जवळ पोहोचला.

जिल्ह्यात दिवसभरात ६ हजार ८१३ चाचण्या झाल्या. यापैकी ४५७ नवीन बाधित आढळले. यात शहरातील विविध वस्त्यांमध्यील ३२१ जणांना कोरोना झाला. तर ग्रामीण भागातील १३ तालुक्यातील १३१ कोरोनाच्या विळख्यात अडकले. यात विदर्भतून ५ नवीन रुग्णांना रेफर करण्यात आले. कोरोनाचा कहर शहरात सर्वाधिक दिसून आला असून आतापर्यंत उपराजधीनीतील वस्त्यांमधील ७१ हजार १७ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर ग्रामीण भागात १९ हजार ५७१ जण बाधित झाले आहेत.

विदर्भातील विविध जिल्हातून रेफर झालेले ५४४ जणांवर मेडिकल, मेयोत उपचार झाले. अशी एकूण ९१ हजार १३२ वर पोहचली असून यापैकी ८१ हजार ८५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तीचा दर ८९.८२ टक्क्यांवर पोहचला आहे. २४ तासांमध्ये दगावलेल्या १९ कोरोनाबाधितांमध्ये शहरातील १० जणांचा तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश होता. तर जिल्हाबाहेरील रेफर केलेले ५ कोरोनाबाधित दगावले.

एम्समध्ये वाढणार खाटा

नुकतेच एम्समध्ये निरीक्षण दौरा झाला असून येथे खाटा वाढविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. सद्या एम्समध्ये कोरोनाबाधितांसाठी सध्या ८० खाटा आहेत. यामुळेच एम्समधील डॉक्टरांची मेयोत प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. अद्याप एम्समधील विभागप्रमुख मेयोत विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. एम्समध्ये ५०० खाटा तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. प्रारंभी मेयोत डॉ. तिलोत्तमा पराते यांनी पहिला कोरोनाबाधित रुग्ण हाताळला होता. त्यांच्या मार्गदर्शनात मेयोत अतिशय नियोजनपुर्वक काम सुरू आहे. त्या रुजू झाल्यानंतर मेयोत रुग्णांकडे काळजीने लक्ष देण्यात येत असल्याची माहिती खुद्द रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. एम्समध्ये खाटा वाढवण्याचे नियोजन असल्याने मेयोत प्रतिनियुक्तीवरील डॉक्टर पुन्हा एम्स्मध्ये परत येतील, अशी चर्चा आहे.

१,५०० कोरोनाबाधित रुग्णालयात

कोरोनाचा जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात उद्रेक झाला होता. ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण मेयो, मेडिकल, एम्स सहित विविध रुग्णालयात दाखल होते. अत्यवस्थ रुग्णांची संख्या सर्वत्र वाढल्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांतही बाधितांना खाटा मिळायला अडचणी येत होत्या. मात्र ऑक्टोंबरच्या २० दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आलेख रोडावला. शहरात ३ हजार ८६७ तर ग्रामीणला २ हजार ४४७ असे एकूण ६ हजार ३१० सक्रीय कोरोनाबाधित आहेत. त्यातील केवळ १ हजार ५४७ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ४ हजार ३०६ बाधित गृहविलगिकरणात उपचार घेत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com