नागपुरात कोरोना संशयिताचा मृत्यू...दोन दिवसांत एकही बाधित नाही

death
death

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) बुधवारी दुपारी मध्य प्रदेशातील सिवनी येथील सत्तर वर्षीय कोरोना संशयित वृद्धाचा मृत्यू झाला. या रुग्णाचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर मृत्यूचे कारण पुढे येईल.

या रुग्णाची प्रकृती तीन दिवसांपासून प्रकृती खालवली होती. नातेवाईकांनी त्यांना मध्यप्रदेशच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. श्वास घेतांना त्रास होण्यासह न्युमोनिया  असल्याचे निदान झाले  आहे . कोरोनाची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगताच तातडीने त्यांना नातेवाईकांनी ३१ मार्चला नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलवले. येथील कोरोना संशयित वार्डात हलवले. दरम्यान, त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने प्रशासनाने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. नागपुरातील एकूण रुग्णसंख्या १६ वर पोहचली आहे.

मेयोत 30, मेडिकलात 25 संशयित दाखल
बुधवारी मेयोत दुपारी ४ पर्यंत कोरोनाची लक्षणे असलेले नवीन २० तर मेयोत ३ जणांना दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

१,२१५ जणांना घरात एकांतवास 
विदेशातील प्रवासाचा इतिहास असलेल्यांसह कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने शहरातील सुमारे १,२१५ जणांना त्यांच्या घरातच खबरदारी म्हणून एकांतवासात राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. या सगळ्यांना त्यांचे कपडे व भांडी वेगळेच वापरण्यासह घरातील कुणाच्याही संपर्कात न येण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत. सोबतच बुधवारी दुपारपर्यंत सुमारे ३३७ जणांना आमदार निवासात विलगिकरणात ठेवले गेले आहे. शहरात आजपर्यंत करोनाचे १६ रुग्ण आढळले असून पैकी ४ जण बरे होवून परत गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com