"तू चल पुढं, तुला रं गड्या भीती कुणाची...'

राघवेंद्र टोकेकर
गुरुवार, 28 मे 2020

नाटकाच्या सादरीकरणात सर्व घटकांना जोडून ठेवणारे हरहुन्नरी नेपथ्यकार स्वप्नील बोहटे यांनी गरजू कलाकारांसाठी, वेशभूषा, रंगभूषा व रंगमंचावरील प्रत्येक जबाबदारीचे निर्वाहन करणाऱ्या व्यक्तीसाठी एक सहकार्य संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, या कार्याची दिशा ठरली नसली तरी मोठ्या संख्येने रंगभूमी क्षेत्रातील सदस्य त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना दिसत आहेत. शिवाय गौरव खोंड, शंकर संखपाळे, निखिल टोंगळे, प्रियंका तायडे, भावना चौधरी, रूपाली कोंडेवार मोरे, श्वेता पत्की-देशपांडे व रोशन खोब्रागडे यांनीही स्वप्नील त्यांच्या कार्यात पुढाकार घेतला आहे.

नागपूर : कोरोनाचा फटका रंगभूमीलाही बसला आहे. सध्या शहरातील नाट्य चळवळ पूर्णतः बंद आहेत. हातावर पोट असलेल्या पडद्यामागील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण, थांबेल ती मनोरंजनसृष्टी कसली! "तू चल पुढं, तुला रं गड्या भीती कुणाची...' असे म्हणत कलाकार एकमेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अर्थात, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी "ते' सज्ज झाले आहेत.

नाटकाच्या सादरीकरणात सर्व घटकांना जोडून ठेवणारे हरहुन्नरी नेपथ्यकार स्वप्नील बोहटे यांनी गरजू कलाकारांसाठी, वेशभूषा, रंगभूषा व रंगमंचावरील प्रत्येक जबाबदारीचे निर्वाहन करणाऱ्या व्यक्तीसाठी एक सहकार्य संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, या कार्याची दिशा ठरली नसली तरी मोठ्या संख्येने रंगभूमी क्षेत्रातील सदस्य त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना दिसत आहेत. शिवाय गौरव खोंड, शंकर संखपाळे, निखिल टोंगळे, प्रियंका तायडे, भावना चौधरी, रूपाली कोंडेवार मोरे, श्वेता पत्की-देशपांडे व रोशन खोब्रागडे यांनीही स्वप्नील त्यांच्या कार्यात पुढाकार घेतला आहे.

लॉकडाउनच्या काळात नाट्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले. जवळजवळ सगळेच नाटक समूह सध्या बंद आहेत. या क्षेत्रातील कामगार व तंत्रज्ञांच्या रोजीरोटीवर मोठा परिणाम झाला आहे. केवळ आपत्ती आली की, निधी संकलन करण्यापेक्षा हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवणे आवश्‍यक असल्याचे मत स्वप्नील बोहटे यांनी व्यक्त केले. या सेवा संकल्पाला केवळ कोरोनापुरते मर्यादित न ठेवता यातून भविष्यातील संकटांचा सामना करता येईल इतके ठोस काहीतरी निर्माण होणे गरजेचे आहे. त्याच दिशेने प्रयत्न करणार असल्याचे स्वप्निल बोहटे म्हणाले.

अवश्य वाचा- ओबीसी विद्यार्थ्यांबाबत केंद्राचा अन्यायकारक निर्णय, वाचा काय आहे प्रकार...

योग्य उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न

संकट कायमच संघर्षाचा नवा मार्ग दाखवतो. तसे मार्ग लवकरच नागपुरातील रंगभूमी क्षेत्रालाही दिसेल. गरीब व गरजू सदस्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे योग्य उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्वप्नील बोहटे म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's blow has hit the theater as well