नागपुरात मृत्यूचा उद्रेक थांबता थांबेना; कोरोनाने आतापर्यंत एवढ्या रुग्णांचा घेतला बळी.

file photo
file photo

नागपूर : कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड वाढला आहे. नागपुरात बुधवारी (ता. १२) एकूण ६२१ कोरोनाबाधित आढळले. २१ मृत्यूचीही नोंद झाली. यामुळे बाधितांचा आकडा १० हजार ९८२ वर पोहोचला आहे. आज आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये शहरातील ४१३ तर ग्रामीण भागातील २०८ जणांचा समावेश आहे. मेडिकलमध्ये १३ आणि मेयोत १४ मृत्यूंची नोंद झाली आहे.  

नागपुरात पाच एप्रिलला कोरोनाच्या दोन मृत्यूंची नोंद होती. मे महिन्यात ११ मृत्यूंची नोंद झाली. जून महिन्यात २५ मृत्यूंची नोंद झाली. मात्र, जुलैपासून सुरू झालेला मृत्यूचा उद्रेक ऑगस्टमध्येही थांबला नाही. दीड महिन्यात ३७५ मृत्यू नागपूरच्या नावावर कोरोनाने नोंदवले. तर अकरा हजारांवर बाधितांचा आकडा फुगला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ८० टक्क्यांवरून ४८.५० टक्क्यांवर आला आहे.

नागपुरात कोरोनाची बाधा होऊन उपचारादरम्यान मेयोत बुधवारी १४ जण दगावले. सोमलवाडा येथील ५९ वर्षीय, नंदनवन व्यंकटेशनगर येथील ६८ वर्षीय, कामठी यशोधरानगर येथील २३ वर्षीय, चंद्रपूर येथील ५० वर्षीय व तांडापेठ येथील ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या पाच महिलांसह लकडगंज येथील ६०, कळमेश्वर येथील ५२, यादवनगर येथील ६५, गिट्टीखदान येथील ६५, विश्रामनगर येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मेयोत मृत्यू झाला. मेडिकलमध्ये दगावलेल्यांमध्ये गंजीपेठ पाटलीपुरा येथील ६८, कामठीतील ६५ वर्षीय महिलेसह पारखीपुऱ्यातील ४७ वर्षीय युवकाचा समावेश आहे. चार महिन्यांत कोरोनाच्या ४०० बळींची नोंद झाली आहे. 

शहरात ५ हजार रुग्ण
मेयो, मेडिकलमधील उपचारानंतर कोरोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांचा आकडा ५ हजार ३२७ पर्यंत गेला आहे. मात्र, कोरोनाबाधितांचा विस्तार गतीने होत असल्यामुळे मेयो, मेडिकल, एम्स आणि सहा खासगी हॉस्‍पिटलसह शहरातील १९ कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५ हजार २५५ एवढी आहे. सध्या यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी अनेक व्हेंटिलेटरवर आहेत. विशेष असे की, होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांची संख्या २ हजार ३१८ एवढी आहे.
 

(संपादन : मेघराज मेश्राम) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com