शेतकऱ्यांनो, तुम्ही कापूस विकला ना; नाही विकला तर त्वरा करा, महासंघाने घेतला हा निर्णय

cotton purchase stop in this week
cotton purchase stop in this week

नागपूर : विदर्भ, परभणी आणि जळगाव या तीन विभागात शिल्लक कापसाची खरेदी या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कापूस खरेदी बंद केली जाईल अशी माहिती, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.

बाजारात कापसाचे दर पाच हजार ५५० रुपये या हमीभावापेक्षा कमी होते. परिणामी शेतकऱ्यांनी सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाला आपला कापूस विकला आहे. त्यामुळे राज्यात यावर्षी विक्रमी ९२ लाख २७ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. येत्या पणन महासंघाकडून येवढा कापूस खरेदी करण्यात आला आहे. अद्यापही विदर्भ परभणी तसेच जळगाव या भागातील शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असून, त्याची खरेदी या आठवड्यात पूर्ण होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात पणन महासंघाकडून कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे. राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची एकूण किंमत ४९३६ कोटी रुपये आहे. त्यापैकी ४३२१ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आल्याची माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष आनंदराव देशमुख यांनी दिली. सद्यस्थितीत ६१४ कोटी रुपयांचे चुकारे शिल्लक असून, त्यासाठी लवकरच निधीची तरतूद केली जाणार आहे. साधारणतः या आठवड्याच्या अखेरीस सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस खरेदीची रक्कम जमा होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

शेतकरी हिताला प्राधान्य
राज्यात यावर्षी ९२ लाख २७ हजार क्विंटल इतक्या विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. मनुष्यबळ कमी असतानाही पणन महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देत ही खरेदी केली. सद्यस्थितीत ६१४ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहे. या आठवड्यात त्यासाठी तरतूद करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.
- अनंतराव देशमुख,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com