घराच्या जागेचा क्षुल्लक वाद अन् दोन कुटुंबात घडला भयंकर रक्तपात; एकाचा मृत्यू

Crime in Jalalkheda in Nagpur district
Crime in Jalalkheda in Nagpur district

जलालखेडा (जि. नागपूर) :  घराच्या जागेच्या वादातून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये वाद झाला़. हा वाद विकोपाला जाऊन रक्तपात झाला़. एका कुटुंबातील मंडळीने शेजारच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली़. ही थरारक घटना नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे घडली़. याप्रकरणी जलालखेडा पोलिसांनी एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली़ आहे.

शरद बाबाराव चापले असे मृत तरुणाचे तर गौरव रत्नाकर सावरकर (वय१९), विक्की रत्नाकर सावरकर (वय२२), श्रावण किसन सावरकर (वय१९), कल्पना रत्नाकर सावरकर (वय४५), रत्नाकर बाबुराव सावरकर (वय५२) व दिनेश बाबुराव सावरकर (वय५०, सर्व राहणार लोहारी सावंगा) अशी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गौरव, विक्की रत्नाकर आहेत़. 

गौरव व आरोपी हे शेजारी होते. त्यांच्यामध्ये घराच्या जागेवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता़. हा वाद न्यायालयात गेला असून खटला सुरू आहे़. घटनेच्या दिवशी आरोपी रत्नाकर याने गौरवच्या घराची भिंत तोडून आपल्या घराचे कॉलम बांधले होते़ त्यामुळे गौरवने आरोपीला हटकले होते़. त्यावरून रत्नाकर, कल्पना यांनी शरद याची कॉलर पकडून ढकलले व शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यानंतर आरोपी दुचाकीने शेतात गुरांना चारापाणी करायला गेला़. 

तेथून परत येत असताना आरोपी कल्पना रत्नाकर सावरकर यांनी शरदला पकडून ठेवले व गौरव, विक्की, श्रावण यांनी चाकूने सपासप वार करून जखमी केले़. घटनेची माहिती शरदची बहिण सविता बाबाराव चापले हिला माहिती होताच तिने घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा चाकूने वार करणे सुरुच होते. शरदला उपचारार्थ नागपूर येथे हलविले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़. याप्रकरणी सविताच्या तक्रारीवरून जलालखेडा पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केली़

पोलिस स्टेशनला तक्रार केल्याने चाकु हल्ला

घरबांधकाम करताना पिल्लर शरद याच्या जागेत गेल्याने त्याने गौरव व त्याच्या आई-वडीलांशी भांडण केले़ याची तक्रार गौरव यांच्या आई-वडिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने शरदने गौरव व त्यांच्या आई-वडीलांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची तक्रार गौरव यांने पोलिसात दिली़ त्याच्या तक्रारीवरून मृतक शरद याच्याविरोधात कलम 326,324 व 232 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला़ पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश काळे हे करीत आहे़. 

.संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com