पोस्टाचा गरजूंना मदतीचा हात, बँक खात्यातले पैसे मिळणार पोस्टातून

Customer can withdraw mony through AEPS
Customer can withdraw mony through AEPS

नागपूर : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून, याचा संसर्ग थांबवण्यासाठी जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन करीत सरकारने देश लॉकडाऊन केला आहे. अशा परिस्थितीतही टपाल विभागाचे कर्मचारी विशेषत: पोस्टमन गरजूंना मदतीचा हात देत आहे. दरम्यान, एईपीएसच्या माध्यमातून टपाल विभागाच्या नागपूर विभागातर्फे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी 84 हजार ट्रॅन्झॅक्शन केले असून याद्वारे सुमारे वीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ला केवळ पत्रव्यवहारापुरते सीमित न ठेवता टपाल विभागाने आपले स्वरूप बदलले आहे. भारतीय टपाल विभागाच्या इंडिया पोस्ट पेंमेंटस् बँकेंद्वारा ग्राहकांच्या सेवेत आधार संलग्न भुगतान सेवा अर्थात एईपीएस सुरू केली आहे. एईपीएसच्या माध्यामातून टपाल विभागाच्या कोणत्याही शाखेतून ग्राहकांना आपल्या बँक खात्यातून पैसे काढता येतात. याच सुविधेचा वापर करून १९ कोटी ६६ लाख रुपये एवढी रक्कम ८४ हजार १६२ गरजू ग्राहकांपर्यंत पोहोचवल्याची माहिती आयपीपीबीचे विभागीय व्यवस्थापक अभिजीत जिभकाटे यांनी दिली.
आधार संलग्न भुगतान सेवाच्या माध्यमातून ग्राहकांना बँक खात्यातील पैसे दिले जात आहेत. याकरिता विभागातील ५१४ टपाल कार्यालयात ८७० कर्मचारी कार्यरत आहेत. या सुविधेचा लाभ विशेषत: ग्रामीण भागातील नागरिक घेत असून, या माध्यमातून १० हजार रूपयांपर्यंतची रक्कम ग्राहकांना दिली जात आहे. लॉकडाऊन दरम्यान टपाल कर्मचा-यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दलची माहिती केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी एप्रिल महिन्यात ट्विट करून देत कर्मचा-यांचे कौतुक केले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने टपाल विभागही कमी मनुष्यबळात काम करीत आहे. कर्मचा-यांना एक दिवस आड कामावर बोलविण्यात येत आहे. तर आयपीपीबीचे काही कर्मचारी घरूनच काम करीत आहेत.

बाहेर फिरणारे पोस्टमन घेत आहे विशेष काळजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाेस्ट कर्मचाऱ्यांकडून विशेष काळजी घेतली जात असून, सुरक्षितता आणि स्वच्छता याचे सर्व उपाय राबवले जात आहेत. टपाल कार्यालयात आलेल्या ग्राहकांना स्वच्छ हात धुऊनच कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. तसेच त्यांना वेळोवेळी सॅनिटायझर दिले जात आहे. तर बाहेर फिरणाऱ्या पोस्टमनला  देखील विशेष काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com