मागीतले उधार दिलेले पैसे, कानशिलावर झाडल्या बंदूकीच्या गोळ्या

file
file

बेला (जि.नागपूर) :  हात उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावल्यामुळे मनात राग धरून आरोपीने पोपटलाल डवरे(वय52, केसलापार) यांच्यावर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. सुमारे अठरा तास घटनास्थळी निपचित पडलेल्या डवरे यांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात भरती करण्यात आले असून ते अतिदक्षता विभागात अत्यवस्थ अवस्थेत आहेत.

देशीकट्ट्यातून गोळ्या झाडून जीवघेणा हल्ला
घटनेतील आरोपी अमोल दिलीप बोंडे(वय30, चारगाव, ता.उमरेड) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर दोन आरोपी अनिल गायकवाड (सातगाव) व वैभव ऊर्फ गोल्डी नारनवरे हे पसार आहेत. जखमीने आरोपी अमोल यास एक महिन्यापूर्वी उसने पैसे दिले होते. ते परत मागण्यासाठी त्याने तगादा लावला होता. त्यामुळे आरोपीने डवरे यांच्याविरुद्ध त्याने मनात राग धरला होता. त्यातून पैसे देण्यासाठी आरोपीने डवरे यांना 25फेब्रुवारीला पैसे घेण्याकरिता वडगाव डॅम शिवारात बोलावले. त्यावेळी देशीकट्टा बंदुकीच्या दोन गोळ्या आरोपींनी डवरे यांच्यावर झाडल्या व त्यांच्यावर लोखंडी रॉड देशीकट्ट्याच्या मुठीने वार केले. घटनास्थळावरून दुपारी अडीच वाजता झालेल्या या हल्ल्यात बेशुद्ध होऊन डवरे निपचित पडले असता मृत समजून आरोपी पसार झाले. दरम्यान, घरी न आल्याची तक्रार( बेपत्ता) कुटुंबीयांनी दिल्यामुळे रात्री अडीच वाजेपर्यंत बेला व बुटीबोरी पोलिसांनी शोध घेतला. रात्र झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पोलिसांना जखमी अवस्थेत डवरे डॅम शिवारात आढळले. याबाबत अधिक सखोल तपास केला असता उधारी घेतलेल्या पैशाच्या कारणाने आरोपी अमोल बोंडे याने इतर दोन साथीदारासह पोपटराव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे निष्पन्न झाले.

दडून बसलेले आरोपी अखेर सापडले

गुन्ह्यातील दोन साथीदार हे पसार असल्याने तसेच गुन्ह्यात वापरलेला देशीकट्टा मिळून न आल्याने आरोपींचा शोध घेणे अत्यंत गरजेचे होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने समांतर तपास सुरू करून आरोपींचा शोध घेतला असता. आरोपी अनिल भानुदास गायकवाड हा अजनी परिसरातील रामेश्‍वरी भागात सापडला. आरोपी वैभव ऊर्फ गोल्डी नारनवरे हा प्रतापनगर परिसरातील सुभाषनगर वस्तीतून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दोन्ही आरोपींना बेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हे होते कारण...
उसनवारी घेतलेले पैसे परत करत नसल्यामुळे पोपटराव डवरे हे वारंवार पैसे मागण्याकरिता तगादा लावत होते. वारंवार घरी येऊन चारचौघांत अपमान करीत होते. त्यामुळे याचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांना जिवानिशी ठार मारण्याचा कट रचण्यात आला. त्याकरिता अनिल गायकवाड व वैभव ऊर्फ गोल्डी नारनवरे (डोंगर्ला, ता. तुमसर, जि. भंडारा) या दोघांच्या मदतीने देशीकट्टा जमवून मंगळवारी (ता.25)फोन करून पोपटराव डवरे यांना बोलावून घेतले व वचपा काढल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com