विमानात प्रवाशाचा मृत्यू़; नागपुरात इमर्जंसी लॅंडिंग

योगेश बरवड
Friday, 16 October 2020

वाटेत त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच हालचाल मंदावत गेली. काही वेळाने त्यांची हालचाल पूर्णतः थांबली.

नागपूर : विमान प्रवासादरम्यान प्रवाशाचा मृत्यू होण्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेनंतर संबंधित विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर इमर्जंसी लँडिंग करून मृतदेह उतरवून घेण्यात आला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

चर्चा तर होणारच! रंगीत कापुस ठरणार गेम चेंजर...

अर्जित महंता (४४) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ते कोलकाताचे रहिवासी आहेत. कामानिमित्त ते मुंबईला गेले होते. बुधवारी स्पाईस जेटच्या मुंबई -कोलकाता विमानातून स्वगृही परतत होते.

‘गुच्छी‘चे दर किलोला तीस हजार तरीही संपते हातोहात, जाणून घ्या कारणे...

त्यांच्यासोबत नातेवाइकही होते. वाटेत त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच हालचाल मंदावत गेली. काही वेळाने त्यांची हालचाल पूर्णतः थांबली. यामुळे घाबरलेल्या नातेवाइकांनी विमानातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. वैमानिकाने नागपूर विमानतळाशी संपर्क साधून मेडिकल इमर्जंसीचे कारण देत विमान उतरविण्याची परवानगी मागितली.

रात्री ११ वाजताच्या सुमारास विमान लँड झाले. डॉक्टरांनी तपासणी करून महंता यांना मृत घोषित केले. यामुळे मृतदेह उतरवून घेण्यात आला. नातेवाईकही इथेच थांबले. रात्री उशिरा विमान कोलकाताच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, आज मेयो रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर नागपुरातअंत्यसंस्कार करण्यात आले. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a passenger on a plane