कोरोना चाचण्यांनी गाठला पाच लाखांचा उंबरठा; बाधितांसह मृत्यूचा टक्का घसरला ​

The death rate dropped a corona virus
The death rate dropped a corona virus

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर काहीसे नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. सलग आठव्या दिवशी कोरोनाबाधितांसह मृत्यूचा टक्का घसरला आहे. दरम्यान, आठ महिन्यांत जिल्ह्यात पाच लाखाच्या उंबरठ्यावर चाचण्यांची संख्या पोहोचली आहे.

जिल्ह्यात सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ४८९ आहे. यापैकी ३ हजार ४३ रुग्णांवर मेडिकल, मेयो, एम्ससह ९८ कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ६ हजार ४४६ लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. कोविड विषाणूची लागण झाल्याचा संशयावरून १४५२ व्यक्तींनी खासगी प्रयोगशाळेत चाचणी केली. यापैकी २६० जणांच्या घशातील द्रवाचे नमुने कोरोनाबाधित असल्याचे आढळले. उर्वरित ११९२ जण निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय मेडिकलमध्ये २६, एम्समध्ये ८९, मेयोत ८८, माफसूत २९, निरीतून ६४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी झालेल्या ६ हजार १६५ चाचण्यांतून ५ हजार ४१९ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. शहरात नवीन बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गुरूवारी १ हजार १२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या ७२ हजार ६१४ झाली आहे. आठवडाभरात केवल ७ ऑक्टोबरला कोरोनामुक्तांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात ७ ऑक्टोबरला ९७६ बाधित होते तर ८३५ जणांना कोरोनामुक्त घोषित केले होते.

मात्र, गुरुवारी पुन्हा कोरोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा अधिक आहे. शहर व ग्रामीण भागात दिवसभरात सहा हजार १६५कोरोना संशयितांच्या चाचण्यांची नोंद झाली आहे. यातील ७४६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. तर २४ तासांत २० जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यामुळे सात महिन्यातील मृत्यूची संख्या २७२४ झाली तर कोरनोबाधितांची संख्या ८५ हजारापर्यंत आहे.

मेयो-मेडिकलमधील मृत्यूदरात घट

मेयोत अलिकडे नियोजनपूर्वक काम सुरू असल्याने मेयोतील मृत्यूदरात घट झाली आहे. याशिवाय मेडिकलमध्येही विभागप्रमुख नवीन आले, त्यांनीही नियोजनपूर्वक कामाची हाताळणी केल्याने काहीसा दिलासा मिळाला असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. गुरूवारी मेयोत अवघे तीन मृत्यू झाले तर मेडिकलमध्ये ७ जण दगावले आहेत.

कोरोनामुक्तांची संख्या ७२ हजार पार

येथील शहरी भागात आजपर्यंत ५८ हजार १८४ तर ग्रामीण भागात १४ हजार ४३० असे एकूण ७२ हजार ६१४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या शहरातील ७४५, ग्रामीणच्या २६७ अशा एकूण १०१२ जणांचा समावेश होता. आजपर्यंतच्या एकूण बाधितांच्या तुलनेत आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांचे प्रमाण सध्या ८५.६० टक्के आहे.

संपादन - केवल जीवनतारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com