‘मी जे आहे ते ठामपणे मांडतो, माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल', काँग्रेसच्या नेत्याने का केल हे वक्तव्य

नीलेश डाखोरे
Monday, 24 August 2020

काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक होणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा अध्यक्षपदाचा राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. सोनिया गांधी यांना आता जास्त काळ कार्यकारी अध्यक्षपदावर राहण्याची इच्छा नाही. मात्र, पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांनीच कायम राहावे असे म्हटले आहे. तर तरुण नेत्यांना राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर याव असे वाटते.

नागपूर : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. काँग्रेसचा अध्यक्ष बदला अशी मागणी काही वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली होती. याचे पत्र कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते. यानंतर महाराष्ट्राचे दुग्धविकासमंत्री व काँग्रेस नेते सुनील केदार यांनी वरिष्ठ नेत्यांवर टीका केली. यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे राजकारण चांगलेच तापले होते. अशात सुनील केदार यांनी पत्रकारांशी संवाद साधून ‘मी जे आहे ते ठामपणे मांडतो. माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल', असे मत व्यक्त केले.

काँग्रेसच्या एकूण २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून अध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे गांधी कुटुंबाला समर्थन देणारा आणि काँग्रेसच्या विकासाचा विचार करणारा असे दोन गट पडले आहेत.

पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठिशी आहे. अशात गांधी कुटुंबाच्या कामावर मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्न उपस्थित करणे ही लाजिरवाणी बाब आहे. या नेत्यांनी त्यांनी केलेल्या कृत्यावर तातडीने माफी मागावी, असे झाले नाही तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात कुठेही फिरकू देणार नाही असे सुनील केदार यांनी ट्विट केले होते.

जाणून घ्या - त्या तिघांनी थांबवली अधिकाऱ्याची कार.. अन सुरू झाला प्रकार 'बँड बाजा बारात' .. नक्की काय घडले.. वाचा

काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक होणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा अध्यक्षपदाचा राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. सोनिया गांधी यांना आता जास्त काळ कार्यकारी अध्यक्षपदावर राहण्याची इच्छा नाही. मात्र, पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांनीच कायम राहावे असे म्हटले आहे. तर तरुण नेत्यांना राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर याव असे वाटते.

मतावर आपण ठाम
पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा या तीन नेत्यांनी सोनिया गांधी यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही, या मतावर आपण ठाम आहो. मी जे आहे ते ठामपणे मांडतो. माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल.
- सुनील केदार,
महाराष्ट्राचे दुग्धविकासमंत्री व काँग्रेस नेते

बापरे! - क्राईम : ‘नंदनवन'मध्ये आजोबाने केला नातीवर बलात्कार

ज्येष्ठ, तरुण संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या ट्विटमुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या ट्विटवर आपण कायम असल्याचे केदार यांनी पत्रकरांशी बोलताना पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

... तरच भाजपविरोधात लढता येईल

काँग्रेसचे नेतृत्त्व गांधी घराण्याकडे असेल तरच भाजपविरोधात लढता येईल. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यामागे ठामपणे उभं राहण्याची हीच खरी वेळ असल्याचे सनील केदार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute over the post of President in the Congress