
‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच ‘रशियातील बौद्धधर्म’ हे पुस्तक लिहिले आहे. गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भाऊ लोखंडे होते.
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन
नागपूर : आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी (ता. २२) निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
डॉ. भाऊ लोखंडे यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता. ते मराठी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते.
त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. ते ‘विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलना’चे अध्यक्ष होते. त्यांनी ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच ‘रशियातील बौद्धधर्म’ हे पुस्तक लिहिले आहे. गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भाऊ लोखंडे होते.
थायलंडमधील इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ एनगेज्ड बुड-दिस्टच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य होते. थाई-भूमीमध्ये बौद्ध धर्मावरील चर्चेत जागतिक संमेलनात भाग घेतला होता. नेपाळमध्ये वर्ल्ड फेलोशिप बौद्ध कॉन्फरन्स बौद्ध धम्मावरील प्रबंध सादर केला होता. जपानला भेट दिली आणि डॉ. आंबेडकर यांच्यावर मानवाधिकार परिषदेत मानवाधिकार चँपियनवर सादर केलेला पेपर खूप गाजला होता. निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते.
भाऊ लोखंडे यांनी लिहिलेली पुस्तके
-
अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?
-
डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा
-
मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव
-
महाकवी अश्वघोषरचित बुद्धचरित
-
रशियातील बौद्धधर्म
-
सौन्दरनन्द महाकाव्यम्
-
डॉ. आंबेडकरी बावीस प्रतिज्ञा
-
बौद्धांचे सण उत्सव आणि मानसिकता
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना उपदेश, मार्गदर्शन व शिक्षण विषयक विचार
Web Title: Dr Bhau Lokhande Passed Away
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..