विदर्भ साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. म. रा. जोशी

Dr. Vidarbha Literature Conference M N Joshi
Dr. Vidarbha Literature Conference M N Joshi

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या वतीने हिंगणा येथे 14 व 15 मार्च रोजी होणाऱ्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राज्य शासनाचा "ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' प्राप्त करणारे संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. म. रा. जोशी यांची निवड झाली आहे.

विदर्भ साहित्य संघाचे 67 वे विदर्भ साहित्य संमेलन नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे 14 व 15 मार्चदरम्यान संत गाडगे महाराज महाविद्यालयात होणार आहे. बसवेश्‍वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर मोगलेवार यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे मराठी विभागप्रमुख डॉ. गणेश चव्हाण हे संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्याकडे आहे.
डॉ. मधुकर जोशी हे ज्येष्ठ संत साहित्य अभ्यासक असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याच्या ज्ञानकोशाचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाङ्‌मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी. आणि एम.फिलचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. मराठी बोर्ड ऑफ स्टडी- जबलपूर, नागपूर आणि उज्जैन येथील अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. जोशी यांचे 200 हून अधिक लेख "एनसायक्‍लोपीडिया ऑफ हिंदुइजम'कडून प्रकाशित करण्यात आले आहेत. "सार्थ तुकाराम गाथे'ची हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्तगुरूंचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील 3500 मराठी हस्तलिखितांचे संशोधन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com