धक्कादायक! वेश्यावस्ती गंगा जमुनात घुसले ड्रग्स तस्कर

Drug dealers are active in ganga jamuna red light area in nagpur
Drug dealers are active in ganga jamuna red light area in nagpur

नागपूर : दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या वारंगणांच्या गंगाजमुना वस्तीत ड्रग्स तस्करांनी एंट्री केली असून अनेक दलाल तेथील युवतींना ड्रग्स देऊन देहव्यापार करण्यास बाध्य करीत आहेत. तसेच गंगाजमुनातील अनेक युवती ड्रग्सच्या आहारी गेल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाजमुना वस्तीत सध्या जवळपास चार हजार वारांगणा देहव्यापार करीत आहेत. यामध्ये ७० टक्के वारांगणा १८ ते ३५ वयोगटातील आहेत. तसेच जवळपास ४० ते ४५ अल्पवयीन मुलींचा समावेश असून त्याचे वय १३ ते १७ आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

गंगाजमुनातील २० दलाल ड्रग्स तस्करांच्या संपर्कात असून याकडे लकडगंज पोलिस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आहे. सचिन उर्फ वकिल्या, इंगा, मनोज, वहिद, पहेलवान आणि बंटी हे गंगाजमुनात एमडी पोहचविण्याचे काम करतात. 

कश्‍मीरी गल्लीतील अल्पवयीन मुलींना सचिन बळजबरीने ड्रग्स देत असून गंगाजमुनातील अनेक तरूणींना त्याने ड्रग्सच्या दलदलीत ढकलले आहे. अनेकींना आता एमडी ड्रग्सची लत लागली आहे. नशा देऊन त्यांच्याकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेतल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सचिन आहे टोळीचा म्होरक्या

गंगाजमुनातील दलाल सचिनने लकडगंज पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी ‘सेट’ केले आहेत. त्यामुळे सचिनकडे असलेल्या वारांगणांना पोलिसांचे संरक्षण आहे. वस्तीत सचिनची रंगदारी असून काम करण्यास नकार देणाऱ्या तरूणींना मारहाण करणे, ग्राहकांची लुटमार करणे तसेच वस्तीतील युवकांना दमदाटी करून मारहाण करण्याचे प्रकार तो करीत असल्याची चर्चा आहे.

ऑडिओ क्लीप व्हायरल

गंगाजमुनात आलेल्या एका युवकाला मामा नावाने ओळखल्या जात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पकडले. त्याला चौकीत चार तास बसवून ठेवले. कारवाई करण्याची धमकी देऊन त्याला दोन हजार रूपयांची मागणी केली. त्याने एका मित्राकरवी पोलिस कर्मचाऱ्याला फोन केला असता थेट दोन हजार दिल्यास सोडण्याची तयारी दर्शविली, या फोनची ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली असून त्याने पोलिस विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com