ते चालले होते दारू घेऊन; तोतया पोलिसांनी मागितली 50 हजारांची खंडणी

liquor
liquor

नागपूर : खेड्यावरून गावठी दारू आणणाऱ्या दोन भावंडांना थांबवून पोलिस असल्याची बतावणी करीत चौघांनी 50 हजारांची खंडणी मागितली. राजकुमार अंकुश जाधव (वय 19, रा. कैकाडीनगर झोपडपट्टी) याच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी शेख फैजुद्दीन शेख जाकिरउद्दीन (वय 28, रा. खरबी) व आसिफ शेख रहमान शेख (वय 22, रा. बाबा ताजनगर, खरबी) या दोघांना अटक केली.

राजकुमार व त्याचा मावसभाऊ इंदल जाधव (वय 28) हे दोघे रविवारी जाम या गावी गेले होते. तेथून मोहफुलाची दारू घेऊन नागपुरात आले. घोगली भागात फैजुद्दीन, आसिफ व त्यांच्या दोन साथीदारांनी राजकुमार व इंदल यांना अडविले. पोलिस असल्याची बतावणी केली. दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर चौघांनी त्यांच्याकडील मोबाईल व 2 हजार 800 रुपयांची रोख हिसकावली. कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. दोघांनी पैसे देण्यास होकार दिला. गुन्हेगारांनी राजकुमार याला सोडले; तर इंदल याला पकडून ठेवले. राजकुमार याने थेट हुडकेश्‍वर पोलिस ठाणे गाठले. हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकमल वाघमारे यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांच्यासोबत संपर्क साधला. आकोत यांनी राजकुमार याची सुटका करून आरोपींना अटक करण्यासाठी घोगली बेसा भागात सापळा रचला.

सविस्तर वाचा~ उपराजधानीत कोरोनाचा पहिला बळी
पैसे जमले असून, ते घेण्यासाठी बेसा येथील पेट्रोल पंपाजवळ या, असे राजकुमार याने आरोपींना सांगितले. आरोपींनी इंदल याची सुटका केली. फैजुद्दीन व आसिफ पैसे घेण्यासाठी पेट्रोल पंपावर आले. दरम्यान, बेलतरोडी पोलिसांनी दोघांना अटक केली. दोघांविरुद्ध लूटमार व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com