esakal | इ-रिक्षा चालक सापडले संकटात; केली ही मागणी..
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा चालकांच्या शिष्ट मंडळासह शहर कॉंग्रेसच्या असंगठीत कामगार सेलचे पदाधिकारी आमदार विकास ठाकरे यांना निवेदन देताना.

विम्याचे 7 हजार 500 रुपये, परवान फी 3 हजार 500 रुपये, रिक्षा नोंदणी फी 1 हजार 700 रुपये आणि दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश सरकारने ई-रिक्षा चालकांना केलेल्या 5 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीप्रमाणे राज्य शासनानेसुद्धा मदत करावी, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली.

इ-रिक्षा चालक सापडले संकटात; केली ही मागणी..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : लॉकडाऊनमुळे नागपूरसह राज्यात मोठया प्रमाणात असलेला ई-रिक्षा चालकांचा वर्ग आर्थिक अडचणींमध्ये सापडला आहे. संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला असुन ज्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. वीजेचे बिल, बॅकेचे हप्तांची रक्‍कम भरु शकत नाही, परिवाराचे पालन-पोषण, मुलांच्या शिक्षणासारखे गंभीर प्रश्‍न त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे, अडचणीत सापडलेल्या ई-रिक्षा चालकांच्या समस्या शासनाकडे मांडणार असल्याचे आश्‍वासन आमदार विकास ठाकरे यांनी दिले. 

शहर कॉंग्रेसच्या असंगठीत कामगार सेलचे अध्यक्ष राज खत्री, पंकज लोणारे, विवेक निकोसे यांच्या नेतृत्वामध्ये ई-रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळानी आमदार ठाकरे यांची भेट घेतली. विम्याचे 7 हजार 500 रुपये, परवान फी 3 हजार 500 रुपये, रिक्षा नोंदणी फी 1 हजार 700 रुपये आणि दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश सरकारने ई-रिक्षा चालकांना केलेल्या 5 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीप्रमाणे राज्य शासनानेसुद्धा मदत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

वाचा : पंढरपूरला नव्हे तर येथे ओसंडून वाहिला भक्‍तांचा महापूर...

त्यानुसार, आमदार विकास ठाकरे यांनी तातडीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्राव्दारे ई-रिक्षा चालाकांच्या मागण्या कळविल्या. यावेळी संकल्प सहारे, अमोल लोणारे, बाल्या भनारकर, लंकेश उके, स्वामी रामानंद, विनोद तांदुळकर, प्रशांत पेठे, देवनाथ पराते, चुडामन सोनकुसरे, दिलीप निमजे, प्रदिप कावळे, शेख अकील आदी ई-रिक्षा चालक उपस्थित होत.