‘ईझी पासवर्ड’ ठेवताहात जरा थांबा, सायबर क्रिमिनल्सची तुमच्यावर नजर

Easy passwords are dangerous, the risk of cyber crime
Easy passwords are dangerous, the risk of cyber crime

नागपूर  ः एटीएम कार्ड, फोन पे, पेटीएम, गुगल पे आणि पेमेंट ॲप्सला ‘ईझी पासवर्ड’ ठेवल्यामुळे सायबर क्रिमिनल्सचे चांगलेच फावते.  पासवर्ड मिळविण्यासाठी सायबर क्रिमिनल्स सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. फेसबुक आणि ट्वीटरवर अपलोड केलेल्या फोटोंमधून पासवर्ड चोरी होण्याचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांना सोशल मीडियावर अकाऊंट उघडताना खासगी माहिती मागितली जाते. त्यामध्ये जन्मतारीख, जन्मवर्ष, फोन नंबर, टोपण नाव, जॉबसंदर्भात माहितीचा समावेश राहतो. तसेच अनेकांना फेसबूकवर स्वतःचे फोटो, कार-दुचाकीचे फोटो आणि मुलांच्या नावासह फोटो टाकण्याची सवय असते. 

या सर्व बाबींचा फायदा सायबर क्रिमिनल्स घेत असतात. डिजिटल पेमेंट करताना किंवा एटीएमने पैसे काढताना अडचणी येऊ नये म्हणून अनेक जण सोपा पासवर्ड ठेवतात. जवळपास ३० ते ३५ टक्के ग्राहकांचे पासवर्ड जन्मतारीख, जन्मवर्ष, फोन नंबर, टोपण नाव, मुलाचे नाव, कार, दुचाकीचा क्रमांक असतो. 

हे सर्व पासवर्ड सहज मिळू शकतात. त्यावरून सायबर क्रिमिनल्स आपले अकाउंट हॅक करू शकतात किंवा पेमेंट ॲप्समधून मोठी रक्कम परस्पर उडवू शकतात. स्वतःची सुरक्षा आपल्याच हाती आहे. तीन महिन्यांतून एकदा तरी आपला पासवर्ड बदलायला हवा. त्यामुळे हॅक होण्याचा धोका कमी असतो. 
 

चुकूनही ठेवू नका हे पासवर्ड

वन, टू, थ्री, आयलवयू, एकदोनतीन एबीसी, वनझीरोवन, स्वतःचे नाव, कार क्रमांक, मोबाईलचे शेवटचे चार अंक, जन्मतारीख, जन्म वर्ष, मुलाचे किंवा मुलीचे नाव, एक ते सहा क्रमांक, टोपण नाव, नोकरी करीत असलेल्या कंपनीचे नाव तसेच आपल्या पत्नीचे नाव अशा प्रकारचे पासवर्ड चुकूनही ठेवू नका. हे सर्व पासवर्ड आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर क्रिमिनल्स मिळवू शकतात.

निवडा स्ट्रॉंग पासवर्ड

पासवर्डमध्ये एक कॅपिटल, अंक, कोडवर्ड, अक्षरांचा समावेश असेल तर तो क्रॅक करणं तुलनेनं कठीण होऊ शकते. त्यामुळे पासवर्डमध्ये केवळ क्रमांक ठेवण्यापेक्षा काही अक्षरांचा वापर करा. जवळपास लांबलचक म्हणजेच स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा. अशा पासवर्डची चोरी करणे कठीण असते.
 

चोवीस तासांच्या आत करा तक्रार 
सोशल मीडियावर असलेल्या प्रोफाईलवरून आपली बरीच खाजगी माहिती सार्वजनिक झालेली असते. त्यामुळे फेसबुक, वॉट्सॲपवर आपले खासगी फोटो टाकू नये. हा प्रकार सायबर क्रिमिनल्सला आमंत्रण देण्यासारखा आहे. एटीएम किंवा पेमेंट ॲप्सचे पासवर्ड सोपे ठेवू नये. स्ट्रॉंग पासवर्ड हॅक होण्याची शक्यता कमी असते. तरीही कुणाला सायबर क्रिमिनल्सने गंडविल्यास चोवीस तासांच्या आत सायबर पोलिसांकडे तक्रार करा. आम्ही तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हेगारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करू.
- केशव वाघ (सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम) 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com