सत्तर दिवसांच्या लॉकडाउनमुळे वीजबिलाची थकबाकी किती माहिती आहे काय?

रविवार, 14 जून 2020

मार्च 23 मार्च ते 31 मे दरम्यान विजेच्या मागणीत कमालीची घट झाली. आर्थिक विवंचनेत असणाऱ्या ग्राहकांनी विजेचे बिल भरले नाही. एकट्या नागपूर विभागाची थकबाकी 7 हजार 930 कोटींवर पोहोचली आहे.

नागपूर : सत्तर दिवसांच्या लॉकडाउनमुळे वीजबिल वसुलीवर विपरीत परिणाम झाला आहे. वीजबिलाची राज्यातील थकबाकी 42 हजार कोटींवर पोहोचली असून महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. 

मार्च 23 मार्च ते 31 मे दरम्यान विजेच्या मागणीत कमालीची घट झाली. आर्थिक विवंचनेत असणाऱ्या ग्राहकांनी विजेचे बिल भरले नाही. एकट्या नागपूर विभागाची थकबाकी 7 हजार 930 कोटींवर पोहोचली आहे.

क्लिक करा - आता मुली देखील पॉर्न बघण्यात पुढे... नागपुरात तब्बल एवढे गुन्हे दाखल

लॉकडाउन आधीच्या 6 महिन्यांमध्ये विजेची मागणी व ग्राहकांनी केलेला बिल भरणा यांचा हिशेब काढल्यास दरमहा महावितरणची महसुली मागणी 5 हजार 800 ते 6 हजार कोटींच्या घरात आहे. लॉकडाउनच्या पहिल्या 40 दिवसांत यात मागणी 50 टक्‍क्‍यांनी घट झाली.

मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने मीटर रीडिंगविना गेले, बिले न पाठवल्यामुळे ग्राहकांनीही देयके भरण्याकडे पाठ फिरवली. फेब्रुवारीत बिलिंग डिमांड 7 हजार 785 कोटी होती तर मार्च महिना कडक उन्हाचा असूनही मागणी केवळ 6 हजार 170 कोटी म्हणजे 1 हजार 625 कोटींनी कमी झाली. याच काळात वसुली केवळ 5 हजार 85 कोटींचीच झाली. म्हणजेच 350 कोटींची तूट निर्माण झाली.

जाणून घ्या - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत 16 हजार कोटींच्या मागणीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती केवळ 6 हजार840 कोटीच होती. म्हणजेच मागणीत 9 हजार 160 कोटींची तूट होती. तर, वसुली केवळ 2 हजार 70 कोटीच होऊ शकली. 

महिना महसूल डिमांड   डिमांडमधील तूट वसुली तूट 
फेब्रुवारी  7,795   ---  5,330     2,485 
 मार्च    6,170 1,625  5,085    1,095 
एप्रील व मे  6,840  9,100  2,067  4,773
एकूण 20,805  10,725 12,482  8,333 
महिन्यानुसार मागणी, वसुली व तुट (कोटी रुपयांत

पॅकेज जाहीर करणे गरजेचे
लॉकडाउनमुळे महावितरणच्या महसुलात 20 हजार कोटींची घट होण्याची शक्‍यता आहे. ही गंभीर स्थिती लक्षात घेता केंद्र व महाराष्ट्र सरकारने ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणला 20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करणे गरजेचे आहे. 
- मोहन शर्मा,
अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.