esakal | कोरोना ब्रेकिंग : पुणे, मुंबईपासून नागपूरला सर्वाधिक धोका; एकूण बाधित 931
sakal

बोलून बातमी शोधा

Eleven corona patients found infected in the city on Friday

गुरुवारी अकरा रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. या रुग्णांमध्ये अकोला व अमरावतील येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. शहरातील बाधितांचा आकडा 931 वर पोहोचला आहे. पुढील तीन-चार दिवसांत हा आकडा एक हजारचा पल्ला गाठेल यात कोणतीही शंका नसल्याचे रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून दिसून येते. 

कोरोना ब्रेकिंग : पुणे, मुंबईपासून नागपूरला सर्वाधिक धोका; एकूण बाधित 931

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात पुणे, मुंबईसह इतर शहरातून येणाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. परंतु, अनेक विषाणूची बाधा असलेले व्यक्ती नागपुरात दाखल होत असल्याची चर्चा आहे. खासगी वाहनातून येणाऱ्यांची संख्या प्रचंड गतीने वाढली आहे. यात नागपूरच्या सीमेत प्रवेश केल्यानंतर अनेकांशी भेट भलाई करीत आहेत. काही घरातच लपून राहत आहेत. मुंबईहून ट्रकमध्ये लपून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात गावचा व्यक्ती आला होता. असे प्रकार घडत असल्याने पुण्यामुंबईतून नागपुरात दाखल होणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे, अशी चर्चा विलगीकरण कक्षासह वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्येही आढळून आली आहे. 

जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत गतीने वाढू लागला आहे. शहरातील झोपडपट्ट्यांध्ये कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला. एकाच दिवशी 86 जणांना विळख्यात घेतले होते. गुरुवारी मेयो, मेडिकल, एम्स आणि नीरीसह माफसूच्या तपासणीतून 57 जणांना बाधा झाल्याचे पुढे आले होते. शुक्रवारी अकरा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 931 वर पोहोचला आहे. तर 542 जण कोरोनातून बरे झाले आहेत. 

हेही वाचा - नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी

गुरुवारी आढळून आलेले सर्व कोरोनाबाधित पाचपावली विलगीकरणातील आहेत. लष्करीबाग परिसरात अचानक बाधितांचा आकडा वाढला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाईक तलाव वस्तीतील सात रुग्णांसह मोमिनपुऱ्यातील 5, शांतीनगरात 10, हंसापुरी येथील 4 तर भगवाघर (गीतांजली टॉकिज) परिसरातील 5 अशा 57 रुग्णांची भर पडल्याने उपराजधानीतील रुग्णांचा आकडा 920 वर पोहोचला आहे. 

नागपूर शहरात कोरोनाच्या मृत्यूवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. दररोज दोन आकड्यातील रुग्णसंख्या आढळून येत असल्याचे प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय सारीच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. नुकतेच अकोला येथील एका सारीच्या 56 वर्षीय रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान मेडिकलच्या प्रयोगशाळेतून आले.

अधिक माहितीसाठी - पप्पा गेल्यामुळे मला जीवनात रस राहिला नाही, मी पण जाते...

गुरुवारी परत अकरा रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. या रुग्णांमध्ये अकोला व अमरावतील येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. शहरातील बाधितांचा आकडा 931 वर पोहोचला आहे. पुढील तीन-चार दिवसांत हा आकडा एक हजारचा पल्ला गाठेल यात कोणतीही शंका नसल्याचे रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून दिसून येते. 

मृताचा परिवार कोरोनाबाधित

डायलिसीससाठी आल्यानंतर एकाला कोरोनाची बाधा आढळून आली होती. उपचारादरम्यान त्याचा सात जून रोजी मृत्यू झाला. या मृताच्या परिवारातील सर्वच पाच जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पाचपावली येथील विलगीकरणात ते होते. यामुळे या भागात आणखी कोरोनाचा आकडा वाढण्याची दाट शक्‍यता आहे.

क्लिक करा - धोका वाढला, एकाच कुटुंबातील 12 जण पॉझिटिव्ह; एक वर्षीय चिमुकलाही सुटला नाही...

एम्समध्ये 12 चिमुकल्यांवर उपचार

एम्समध्ये नुकतेच कोरोनाबाधितांसाठी एक वॉर्ड तयार करण्यात आला होता. परंतु, 54 रुग्ण दाखल झाल्यामुळे दुसरा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. सध्या एम्समध्ये 54 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील 12 चिमुकली मुले आहेत. या मुलांवर मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत.