कोण म्हणाले इंग्लंडमध्ये सर्वाधिक वर्णद्वेश ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर वर्णद्वेशाचा मुद्दा पुन्हा उफाळून आला. आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रातही त्याचे पडसाद उमटले. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि डॅरेन सॅमी यांनीही आपल्याला वर्णद्वेशाचा सामना करावा लागला होता, असे सांगितले होते.

नागपूर : अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर वर्णद्वेशाचा मुद्दा पुन्हा उफाळून आला. आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रातही त्याचे पडसाद उमटले. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि डॅरेन सॅमी यांनीही आपल्याला वर्णद्वेशाचा सामना करावा लागला होता, असे सांगितले होते. आता आणखी एक वेस्ट इंडिज क्रिकेटपटू टिनो बेस्टने इंग्लंडमध्ये त्याला कसा वर्णद्वेशाचा सामना करावा लागला याविषयी खुलासा केला आहे. जगात कुठेही क्रिकेट खेळू शकतो. मात्र, इंग्लंडमध्ये खेळणार नाही; कारण तिथे सर्वांत जास्त वर्णद्वेश केल्या जातो, असे तो म्हणाला.

वाचा - विंडीजच्या तोफखान्याविरुद्‌ध एकटेच लढले होते विदर्भाचे मुर्तीराजन

नागपूरचे डॉ. यश काशीकर यांच्या इन्स्टाग्रामवरील "से यश टू स्पोर्टस' या कार्यक्रमात बेस्ट बोलत होता. वेगवान गोलंदाज असलेल्या टिनोने 25 कसोटींत विडींजचे प्रतिनिधित्व केले आहे. तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना मला कधीही वर्णद्वेशाचा सामना करावा लागला नाही. मात्र, इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना वर्णद्वेशाचा सामना नक्कीच करावा लागला.

आणखी वाचा - जडेजा, पुजारासह पाच क्रिकेटपटूंना उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची नोटीस; काय झालंय नेमकं?

काउंटी क्रिकेटमध्ये खेळत असताना प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद केल्यानंतर पंच मुद्दाम माझा चेंडू नो-बॉल ठरवायचे, त्यावेळी प्रचंड संताप यायचा. हे सर्व मुद्दाम केल्या जात असे, याची मला जाणीव होती. मी चिथावणी देणारा आहे, असेही तुम्ही ऐकले असेल. मात्र, एक कृष्णवर्णीय व्यक्ती मैदानावरील सर्व गोऱ्या व्यक्तीविरुद्ध कसा काय चिथावणी देऊ शकतो का, असा सवालही टिनोने केला. कसोटीत 57 आणि एकदिवसीय सामन्यात 34 बळी घेणारा टिनो म्हणाला, सॅमी आणि गेलने जे अनुभव कथन केले ते अगदी खरे आहे आणि त्यांना माझा पाठिंबा आहे. वर्णद्वेशाचा सामना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने बोलायला पाहिजे, असेही तो म्हणाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England..it’s a very racial place