वकिलांचे पॅनल आहे तरी कशाला? विद्यापीठाकडून बाहेरच्या वकिलांवर सहा लाखांवर खर्च

मंगेश गोमासे
Monday, 9 November 2020

या वकिलांमार्फत वेळोवेळी विविध प्रकरणात विद्यापीठाची बाजू मांडण्यात येते. विशेष म्हणजे वकिलांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि पात्रतेवरून निवड करण्यात येते. असे असतानाही काही विशिष्ट प्रकरणात विद्यापीठाने २०१८ मध्ये ६ तर २०१९ मध्ये ४ वकील अशा एकूण १० वकिलांना न्यायालयासमोर प्रकरणाच्या सुनावणीसाठी नेमले.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध न्यायालयीन प्रकरणांवर गेल्या चार वर्षांत ५८ लाख ७१ हजार ५० रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे वकिलांचे पॅनल असताना दोन वर्षांत दहावेळा पॅनलच्या बाहेरच्या वकिलांना विद्यापीठांच्या केसेस देत, त्यांच्यावर सहा लाखांवर खर्च केल्याचे अभय कोलारकर यांनी विचारलेल्या माहिती अधिकारातून समोर आले आहे.

विद्यापीठाच्या विविध प्रकरणात विद्यार्थी, कर्मचारी आणि इतर नागरिकांनी न्यायालयात खटले दाखल केले. त्यात २०१७ साली १६६, २०१८ ला १९८, २०१९ ला १४३ तर २०२० साली २० केसेस दाखल आहेत. या खटल्यांमध्ये विद्यापीठाची बाजू मांडण्यासाठी तयार केलेल्या लिगल पॅनलच्या माध्यमातून वकील देण्यात येतात. ॲड. पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वात या पॅनलमध्ये ५१ वकिलांची निवड करण्यात आली.

सविस्तर वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

या वकिलांमार्फत वेळोवेळी विविध प्रकरणात विद्यापीठाची बाजू मांडण्यात येते. विशेष म्हणजे वकिलांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि पात्रतेवरून निवड करण्यात येते. असे असतानाही काही विशिष्ट प्रकरणात विद्यापीठाने २०१८ मध्ये ६ तर २०१९ मध्ये ४ वकील अशा एकूण १० वकिलांना न्यायालयासमोर प्रकरणाच्या सुनावणीसाठी नेमले. या वकिलांच्या मानधनापोटी २०१७ साली २ लाख ६५ हजार आणि २०१९ मध्ये ४ लाख १० हजार रुपपे खर्च केले.

दुसरीकडे पॅनलवर असलेल्या वकिलांच्या मानधनापोटी २०१६-१७ साली १४ लाख ५५ हजार, २०१७-१८ साली २० लाख ४४ हजार, २०१८-१९ साली २२ लाख ६२ हजार, २०१९-२० या वर्षात १९ लाख १९ लाख ४८ हजार ५५० तर ३० सप्टेंबर महिन्यापर्यंत ४ लाख २३ हजार ५०० रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या चारही वर्षांत विद्यापीठाने प्रत्येकी २५ लाखांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

जाणून घ्या - आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून

२४ कर्मचाऱ्यांचे विद्यापीठावर खटले

विद्यापीठाने कर्मचाऱ्यांवर गेल्या चार वर्षांत एकही खटला दाखल केला नसला तरी २४ कर्मचाऱ्यांनी विद्यापीठावर खटले दाखल केलेले आहेत. यात २०१७ - १२, २०१८- ६, २०१९ - ४, २०२० -२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even though there was a panel of lawyers there were outside lawyers