विद्यापीठाच्या ‘ॲप'चा तांत्रिक गोंधळ; विद्यार्थ्यांची शोधाशोध; मॉक टेस्ट सफलतेचा विद्यापीठाचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam App of RTMNU is not working properly

गुरुवारी दुपारपर्यंत अॅप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल, अशी घोषणा विद्यापीठ प्रशासनाने केली होती. परंतु दुपारपर्यंत अॅप विद्यापीठाच्या प्लॅटफॉर्मवर व गुगल प्ले स्टोअरवर अपलोड करण्यात आले नाही.

विद्यापीठाच्या ‘ॲप'चा तांत्रिक गोंधळ; विद्यार्थ्यांची शोधाशोध; मॉक टेस्ट सफलतेचा विद्यापीठाचा दावा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे अंतिम सत्र परीक्षेसाठी तयार केलेले अँड्रॉइड मोबाइल अॅपला पहिल्याच दिवशी तांत्रिक त्रुटींचा सामना करावा लागला. यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

गुरुवारी दुपारपर्यंत अॅप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल, अशी घोषणा विद्यापीठ प्रशासनाने केली होती. परंतु दुपारपर्यंत अॅप विद्यापीठाच्या प्लॅटफॉर्मवर व गुगल प्ले स्टोअरवर अपलोड करण्यात आले नाही. अखेरीस विद्यापीठाने त्यांच्या संकेतस्थळावर अ‍ॅप डाउनलोड करण्याचे सांगून वेळ मारून नेली. 

हेही वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व

त्यातही संध्याकाळी सात वाजतापर्यंत अ‍ॅप डाउनलोड झालेच नाही. विद्यार्थ्यांना अ‍ॅपसाठी दिवसभर थांबावे लागले. काही विद्यार्थ्यांनी संकेतस्थळ देखील संथगतीने सुरू असल्याची तक्रार केली, त्यानंतर अ‍ॅप डाऊनलोड करण्यात समस्या आल्या. यासंदर्भात विद्यापीठांचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे म्हणाले, गुगल प्ले स्टोअरद्वारे अ‍ॅप अपलोड करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे विद्यापीठानेच विद्यार्थ्यांना हे अ‍ॅप आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहे. अॅप चांगले कार्य करीत असून मॉक टेस्ट देखील केल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला.

कमी इंटरनेटमध्येही सोडविता येणार पेपर

१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम सत्र परीक्षेसाठी विद्यापीठाने अ‍ॅप तयार केले आहे. कमीतकमी इंटरनेट डेटा खर्च करून विद्यार्थी या अ‍ॅपद्वारे परीक्षा देता येईल, असा विद्यापीठ प्रशासनाचा दावा आहे. विशेष म्हणजे पेपर दरम्यान काही कारणास्तव इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये व्यत्यय आलास परीक्षेवर परिणाम होणार नाही. कनेक्टिव्हिटी पोहोचताच विद्यार्थ्यांची उत्तरे सेव्ह असतील. पुन्हा लॉगिन करताच पुढील उर्वरित प्रश्न सोडवू शकतील. लॉगिनसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रात यूजर आयडी व पासवर्ड देण्यात येईल. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘सबमिट' बटण दाबावे लागेल. त्यानंतरच त्यांचा फॉर्म विद्यापीठाकडून स्वीकारला जाईल.

क्लिक करा - या देशांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत आहेत विचित्र कायदे; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

उत्तरे बदलता येणार नाहीत

पेपर सोडविल्यानंतर, विद्यार्थ्यांनी सबमिट बटण दाबायला विसरल्यास, ते लॉगिनच्या वेळानंतर तीन तासांच्या आत लॉग इन करुन सबमिट करू शकतील. एकदा त्यांनी सबमिट बटणावर दाबल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरे बदलता येणार नाहीत.


संपादन - अथर्व महांकाळ 

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mool
loading image
go to top