esakal | मनीम्याऊचं बाळ कसं गोरं गोरं पान, टाळेबंदीत वाढले चाहते 
sakal

बोलून बातमी शोधा

manjar.jpeg

टाळेबंदीच्या काळात मनुष्य कधी नव्हे ते इतका काळ घरी राहीला. कायमच कामात व्यस्त राहणाऱ्या या मन्युष्याला मग बालपणीचे दिवस, नातलग अन्‌ जुने मित्र आठवू लागले. ज्यांना "इवलीशी जिवणी नि इवलेसे दात, चुटुचुटू खाती कसा दूध आणि भात' हे आजीने घास भरवितांना गायलेले बोल आठवले त्यांनी मांजरीच्या शोधात थेट आदित्य राऊत यांचे घर गाठले.

मनीम्याऊचं बाळ कसं गोरं गोरं पान, टाळेबंदीत वाढले चाहते 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : छान छान छान मनीम्याऊचं बाळ कसं गोरं गोरं पान, या कवितेने मराठी मनाला अक्षरश: भुरळ घातली. असा एकही व्यक्‍ती शोधून सापडणार नाही ज्याने लहानपणी ही कविता ऐकलेली नसेल. विशेष म्हणजे, याच कवितेमुळेच अनेकांना गोऱ्या गोऱ्या मांजरी पाळण्याचाही छंद जडला. कविता काळाच्या आड गेली अन्‌ काळानुरूप मांजरी पाळण्याचा छंद जोपासण्याची पद्धतही बदलली. पण लॉकडाऊनच्या मनीमाऊचे चाहते दुप्पटीने वाढले आहेत. गत अडिच महिन्यांत "पर्शियन कॅट'ची मागणी झपाट्याने वाढली असल्याचे तज्ज्ञ आदित्य राऊत यांनी सांगितले आहे. 

टाळेबंदीच्या काळात मनुष्य कधी नव्हे ते इतका काळ घरी राहीला. कायमच कामात व्यस्त राहणाऱ्या या मन्युष्याला मग बालपणीचे दिवस, नातलग अन्‌ जुने मित्र आठवू लागले. ज्यांना "इवलीशी जिवणी नि इवलेसे दात, चुटुचुटू खाती कसा दूध आणि भात' हे आजीने घास भरवितांना गायलेले बोल आठवले त्यांनी मांजरीच्या शोधात थेट आदित्य राऊत यांचे घर गाठले. कारण गेल्या आठ वर्षांत सर्वाधिक मांजरींची मागणी टाळेबंदीच्या काळात झाली असल्याचे आदित्य राऊत यांनी सांगितले. त्यांनी शहरातील पंचविस कुटुंबांना मांजरीचे बच्चे पुरविले असून, वाहतूक व्यवस्था बंद असल्याने मागणी असूनही छत्तीसगड येथील बच्चे त्यांच्याकडे शिल्लक आहेत.

इवले इवले डोळे, इवले इवले कान अशी उपमा दिलेल्या या मनीमाऊच्या पावलांवर त्यांची किंमत ठरते. आदित्य राऊत यांच्याकडे दहा हजारापासून ते चाळीस हजारापर्यंतच्या मांजरी उपलब्ध असून, मांजरीचे आयुष्य दहा ते बारा वर्षे इतके असल्याचे त्यांनी सांगितले. 

माहिती आहे का - जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर प्राण्यांना जाण्यासाठी "अंडरपास' रस्ता 

मांजरी पाळण्याचा छंद उत्पन्नाचे साधन झाले आहे. आठ वर्षापासून या व्यवसायात मी अनेक चढउतार बघितले. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे मांजरी पाठविल्या. मात्र आठ वर्षांत प्रथमच सर्वाधिक मागणी टाळेबंदीच्या काळात बघितली. टाळेबंदीत लोक घरी होते. अनेकांनी वेळ घालविण्यासाठी मांजरी पाळण्याचा छंद जोपासला आहे. 
आदित्य राऊत, मांजरीचे अभ्यासक.

पांढऱ्या, काळ्या, कथ्थ्या व शेंदरी रंगात दिसणाऱ्या या मांजरी घरात ज्यावेळी मनसोप्त वावरतात त्यावेळी वेगळीच प्रसन्नता निर्माण होत असल्याचे सांगताना आदित्य राऊत यांनी फ्लॅटस्किमच्या काळात हवाहवासा वाटणारा हा सोबती असल्याचे सांगितले. 

go to top