नागपूरच्या पारडी परिसरातून पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण

अनिल कांबळे
मंगळवार, 9 जून 2020

आरोपी राजकुमार गणेश चौधरी (वय 36, न्यू बाबुलखेडा) हा रिना यांच्या भावाचा मित्र असल्यामुळे त्याचे घरी येणे- जाणे होते. त्यामुळे तुकाराम यांच्याही त्याची मैत्री होती. राजकुमार हा दारूडा असल्यामुळे त्याला घरातील सामान किंवा कुणाच्या घरातील सामान विकून दारू पिण्याची सवय आहे. 31 मे 2020 रोजी तो रिना यांच्या घरी आला. जेवण केल्यानंतर तो छतावर झोपला. पहाटे पाच वाजताच्या सुमारास पिंटू याला सोबत घेऊन निघून गेला.

नागपूर : ड्रायव्हर असलेल्या मामाच्या एका मित्राने 15 वर्षीय मुलाचे पारडीतून अपहरण केले. अपहृत मुलाबाबत कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे मुलाच्या आईने पारडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी लगेच दोन पथके तयार करून मुलाचा शोध घेण्यासाठी रवाना केले आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिना तुकाराम शाहू (वय 30) या घर संसार सोसायटी, पारडी परिसरात पती आणि एकुलता एक मुलगा विकास उर्फ पिंटू (वय 15) याच्यासह राहतात. रिना यांचा एक भाऊ ट्रक ड्रायव्हर आहे.

आरोपी राजकुमार गणेश चौधरी (वय 36, न्यू बाबुलखेडा) हा रिना यांच्या भावाचा मित्र असल्यामुळे त्याचे घरी येणे- जाणे होते. त्यामुळे तुकाराम यांच्याही त्याची मैत्री होती. राजकुमार हा दारूडा असल्यामुळे त्याला घरातील सामान किंवा कुणाच्या घरातील सामान विकून दारू पिण्याची सवय आहे. 31 मे 2020 रोजी तो रिना यांच्या घरी आला. जेवण केल्यानंतर तो छतावर झोपला. पहाटे पाच वाजताच्या सुमारास पिंटू याला सोबत घेऊन निघून गेला.

क्लिक करा - तुकाराम मुंढेंचा दणका : फडणवीस यांच्या कार्यकाळातील कर्मचाऱ्यांना केले पुन्हा बडतर्फ

तेव्हापासून पिंटू आणि राजकुमार या दोघांचाही पत्ता नाही. आज-उद्या मुलगा घरी येईल, अशी आशा बाळगून आतापर्यंत रिना यांनी मुलाची वाट बघितली. परंतु, आता पिंटू आणि राजकुमार या दोघांचेही फोन नंबर बंद येत असल्यामुळे काळजीपोटी रिना यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पिंटूचा शोध पोलिस घेत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifteen years boy kidnap from pardi