Finally police caught kidnapper of a boy from Indore
Finally police caught kidnapper of a boy from Indore

अखेर त्या चिमुकल्याला नेपाळला विकण्याचा बेत फसला; अपहरणकर्त्याला इंदोरमध्ये अटक  

नागपूर:  नागपुरातील चार वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून नेपाळला विकण्याच्या बेतात असलेल्या अपहरणकर्त्या आरोपीला पोलिसांनी मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये अटक केली. चिमुकल्याला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. आज बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सक्करदरा पोलिस आरोपी आणि मुलासह नागपुरात पोहचतील. मोहम्मद अदनान समीर शेख शब्बीर, असे अपहृत मुलाचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, फिरदोस फातिमा शेख शब्बीर ही पतीसह कचरा वेचण्याचे काम करते आणि मोठा ताजबाग समोरील फुटपाथवर राहते. ती मूळची नांदेड येथील असून मार्च महिन्यात नागपुरात आली होती. चार वर्षाचा मुलगा अदनान आणि ६ महिण्याची मुलगी तिला आहे. याच ठिकाणी आरोपी फारुक ऊर्फ बम्बय्या इब्राहिम खान (नेपाळ) राहायचा. त्याने अदनान याची आई फिरदोस फातिमा यांच्यासोबत ओळख केली.

सोमवारी  फारुखने अदनानचे अपहरण केले आणि थेट मध्यप्रदेश गाठले. तेथून वॉल्वो बसचे दिल्लीचे तिकिट काढले. दरम्यान फातिमा यांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी फारुक याचा शोध सुरू केला. नागपूर पोलिसांच्या माहितीवरून इंदोर पोलिसांनी फारूखला ताब्यात घेतले.

सक्करदरा पोलिसांचे पथक मध्यप्रदेशमध्ये पोहचले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि मुलाचीही सुखरूप सुटका केली. आज मध्यरात्रीनंतर पोलिस मुलाला घेऊन नागपुरात पोहचतील, अशी माहिती ठाणेदार सत्यवान माने यांनी दिली.

फातिमाने सोडला सुटकेचा निःश्‍वास

मुलाचे अपहरण झाल्यानंतर फातिमा पोलीस ठाण्यात रडत आकांत तांडव करीत बसली होती. मुलगा मिळाल्यानंतरच घरी जाणार अशी भूमिका तिने घेतली होती. पोलिसांच्या हातपाय जोडत मुलाला शोधण्याची विनवणी करीत होती. मुलाला सुखरूप ताब्यात घेतल्याची वार्ताची कानी पडताच फातिमाची जीवात जीव आला.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com