कुख्यात डॉन संतोष आंबेकरवर मकोका, जमीन विक्रीत फसवणूक केल्याने गुन्हा दाखल

fir filed against don santosh ambekar in nagpur
fir filed against don santosh ambekar in nagpur

नागपूर : पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गँगस्टर संतोष शशिकांत आंबेकर व त्याच्या टोळीविरुद्ध पुन्हा मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात केली. आंबेकर याचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३४ आणि प्रवीण व त्याचे अन्य साथीदार यांचा या टोळीमध्ये समावेश आहे.

विकास रामविलास जैन (४१) रा. वर्धमाननगर या व्यापाऱ्याची कामठी तालुक्यातील वडोदा येथे शेतजमीन आहे. त्यावर गोडावून बनवायचे असल्याने त्यांनी तलाठ्याकडून त्या जमिनीचा नवीन सात बारा २३ आक्टोबर २0१९ ला घेतला. त्यावेळी त्यांना माहिती पडले की, ती जमीन कोणीतरी खोटे व बनावटी कागदपत्रे तयार करून ७ फेब्रुवारी २0१५ ला कामठी येथील रजिस्ट्री कार्यालयातून रजिस्ट्री करून घेतली. त्यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांच्या लक्षात आले की, संतोष आंबेकर याने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यांच्या शेत जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून त्याचा वापर केला. तसेच विकास जैन या नावाने बोगस व्यक्ती उभा करून आपले नातेवाईक नितेश माने यांना विक्री करून दिल्याबाबत विक्री पत्र तयार केले. 

आरोपींनी बेकायदेशीरपणे रजिस्ट्री करून त्यांची फसवणूक केल्यामुळे त्यांनी आंबेकर व त्याच्या इतर पाच साथीदारांविरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ चे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी करून आंबेकर व त्याचा भाचा निलेश ज्ञानेश्वर केदार (३४) यांना अटक करून आंबेकरकडून वादग्रस्त बनावट स्थावर शेत जमिनीचे विक्रीपत्र जप्त केले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने मकोकाच्या कलमांची वाढ केली आहे. 

टोळी प्रमुख आंबेकर तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध शहरात व शहराबाहेरील पोलीस ठाण्यात मागील दहा वर्षात एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही आंबेकरवर मकोकाअंर्तगत कारवाई करण्यात आली होती. पुढील तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com