कार शोरूमला भीषण आग; तब्बल ५० लाखांपेक्षा अधिक नुकसान; सुदैवानं जीवितहानी नाही

टीम ई सकाळ 
Saturday, 16 January 2021

प्राप्त माहितीनुसार या गौतम काळे यांच्या मालकीच्या असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून कारची विक्री व सर्व्हिसिंग सेवा ग्राहकांना प्रदान केली जाते.

वाडी (जि.नागपूर) :  वाडी नाक्या जवळून हाकेच्या अंतरावर नागपूर दिशेला काचीमेंट परिसरात महामार्गावर असणाऱ्या केतन हुंडई च्या पेंट ब्रूस्ट पॅनल केंद्राला शनिवारी अचानक आग लागल्याने कर्मचारी व उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

प्राप्त माहितीनुसार या गौतम काळे यांच्या मालकीच्या असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून कारची विक्री व सर्व्हिसिंग सेवा ग्राहकांना प्रदान केली जाते. शनिवारी 11 च्या सुमारास या ठिकाणी कारच्या देखभालीचे कार्य सुरू असताना अचानक पेंट ब्रूस्ट पॅनलला ठिणगी उडून आग लागल्याचे समजते. जवळपास ज्वालाग्राही रसायनचा संपर्क आल्यामुळे जवळपासची यंत्रसामुग्री,  शेडला आग लागली. आग लागली दिसताच उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्वरित ही सूचना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस व अग्निशमन विभागाला दूरध्वनी दवारा दिली .

सूचना प्राप्त होताच वायुसेना अग्निशमन वाहन, मनपाचे नरेंद्र नगर, त्रिमूर्ती नगर अग्निशमन वाहन तसेच वाडी नगर परिषदेचे अग्निशमन वाहन ऐकून 4 वाहन घटनास्थळी पोहोचले .या सर्वांनी संयुक्तपणे कार्यवाही करीत लागलेली आग आटोक्यात आणली. 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

या आगी मध्ये पेंट ब्रूस्ट पॅनल चा विभाग जळून खाक होऊन अंदाजे 50 लाखा पेक्षा अधिक चे नुकसान होण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे .मात्र कोणतीही प्राणहानी झाली नाही.वाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुंमाँ प्यारेवाले यांच्या निर्देशानुसार अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी रोहित शेलारे यांच्या मार्गदर्शनात फायरमन अनुराग पाटील ,आनंद शिंदे, वैभव कोळकर, वाहन चालक नितेश वगैरे यांनी आग विझविण्याचा कार्यात मोठे सहकार्य केले.वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी ही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire in Car showroom in Nagpur