मेट्रोच्या पिलरवर चमकले फ्लेमिंगो! नागपूरकरांसाठी ठरले आकर्षणाचे केंद्र

flamingo designed on metro pillar in nagpur
flamingo designed on metro pillar in nagpur

नागपूर : महामेट्रोने स्टेशनवरील कलाकृती, उड्डाणपुलाच्या माध्यमातून शहराचे आकर्षण वाढविले. आता यात अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारकासमोरील मेट्रोच्या पिलरवरील फ्लेमिंगोचे म्युरल नागपूरकरांचे लक्ष वेधत आहे. 

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत हिंगणा मेट्रो मार्गावर सुभाषनगर मेट्रो स्टेशनजवळील स्वामी विवेकानंद स्मारकसमोर मेट्रो पिलरवर प्लेमिंगो पक्षाचे म्युरल तयार करण्यात आले आहे. या पिलरवर एकूण ४४ प्लेमिंगो आहेत. रात्रीच्या वेळी हे म्युरल ये-जा करणाऱ्या प्रत्येकालाच खुणावत आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या विरंगुळ्याचे स्थान असलेल्या अंबाझरी तलाव परिसराचेही सौंदर्य खुलले आहे. मेट्रो परिसरात उभारण्यात आलेले हे तिसरे म्युरल आहे. यापूर्वी वर्धा मार्गावर छत्रपती चौकातील पिलरवर अशीच एक सुंदर कलाकृती तयार करण्यात आली आहे. याशिवाय झासी राणी चौक मेट्रो स्टेशन येथे राणी लक्ष्मीबाई यांचे म्युरल तयार करण्यात आले आहे. राहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाजवळ 'बेटी बचाव, बेटी पढाव', या संकल्पनेवर आधारित कलाकृती तयार करण्यात आली आहे. या म्युरलची संकल्पना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांची आहे. फ्लेमिंगोचे म्युरल ३५ फूट बाय ८ फूट आकारमानाचे आहे. मेटल शिटच्या साहाय्याने विवेक गोबरे यांनी म्युरलचे डिझाईन तयार केले. 

१ महिन्याचा कालावधी -
विजय श्रीखंडे यांनी डिझाईननुसार म्युरल तयार केले. या कामासाठी तब्बल २२ प्रतिभावंत कलाकारांनी परिश्रम घेतले. डॉ. विनोद इंदूरकर यांच्या मार्गदर्शनात म्युरलचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या स्थानिक कलाकारांनी कटिंग, एम्बोसिंग, कलर ट्रीटमेंट, फ्रेम्स, लेजर कटिंग वेल्डिंग, पेंटिंग इत्यादी कामे केली. फ्लेमिंगो तयार करण्यासाठी १ महिन्याचा कालावधी लागला असून संपूर्ण साहित्य जंगरोधक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com